लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यात बहुतांश भागात नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या बंदमधून शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस सूट देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जाहीर केले.खाद्य पदार्थांची किंवा वस्तुंची दुकाने (किराणा), दूध, अंडी, ब्रेड, भाजीपाला व औषधीची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. जी दुकाने सुरू राहतील त्यांनी दुकानासमोर हात स्वच्छ धुण्यासाठी साबण, पाणी इत्यादीची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्या प्रतिष्ठानांची राहणार आहे. कोणी कोरोनाबाधित असल्याचा संशय आल्यास तपासणीसाठी पाठवावे, त्याने इतर व्यक्ती बाधित होणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.जिल्हा परिषदेने केली २५ लाखांची तरतूदनोवेल कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्याठी आवश्यक असलेल्या बाबींच्या पूर्ततेसाठी गडचिरोली जिल्हा परिषदेने २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनोहर पोरेटी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी बैठक घेऊन कोणकोणत्या उपाययोजना करण्यासाठी किती निधीची गरज भासणार यावर चर्चा केली. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत ६ लाख तर १३ वने मधून उर्वरित निधी अशी एकूण २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांमध्ये उपचाराच्या सोयी करण्यासोबतच उपचारादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये यासाठी आवश्यक मास्क व इतर साहित्यांची खरेदीही केली जाणार आहे.देसाईगंजात बोगस सॅनिटायझरची विक्रीदेसाईगंज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिेटायझरची मागणी वाढल्याने देसाईगंज शहरातील काही औषध विक्रेते बोगस सॅनिेटायझरची दामदुपटीने विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. चार ते पाच रुपयाला मिळणारा सिंगल युज मास्क २० ते ३५ रुपयांना विकला जात आहे. कधीही नाव न ऐकलेल्या कंपनीचे सॅनेटायझर साधा स्टॅम्प मारून विकले जात आहे. सॅनिेटायझर व मास्कची साठवणूक होऊन काळाबाजार होऊ नये, यासाठी प्रत्येक औषधविक्रेता दुकानदाराला स्टॉक मेन्टेन करणे बंधनकारक केले आहे. तरीही सॅनिेटायझर व मास्कचा काळाबाजार होत आहे. यातील काही सॅनिेटायझर व मास्क बोगस असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे.जिल्हा परिषदेत तापमापक यंत्राने तपासणीदरदिवशी शेकडो नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येतात. जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हावी, यासाठी मुख्य दरवाजावरच एक कर्मचारी नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे बंदुकीप्रमाणे दिसणारी तापमापाची स्वयंचलित मशीन देण्यात आली आहे. दरवाजाच्या समोरच ‘येथे उभे राहा’, असे फर्शीवर लिहिले आहे. सदर मजकूर जिल्हा परिषदेत जाणाºया नागरिकांचे लक्ष वेधून घेते. त्याचवेळी उपस्थित असलेला कर्मचारी संबंधित नागरिकाला त्या ठिकाणी उभे राहण्याचा सल्ला देते. कपाळासमोर सदर मशीन धरल्यानंतर तापमानाची नोंद मशिनमध्ये घेतली जाते. कोरोनाग्रस्त रुग्णाला ताप येतो. या मशीनमुळे कोणाला किती ताप आहे हे लक्षात येते.
जिल्हाभर पाळला जातोय स्वयंस्फूर्त बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचे ...
ठळक मुद्देशुक्रवार-शनिवारला सूट : औषध, जीवनावश्यक वस्तू मिळणार, पानठेले मात्र पूर्णपणे बंद