शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

जिल्हाभर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:16 PM

वाढती महागाई तसेच केंद्र शासनाचे धोरण यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनी सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. तान्हा पोळ्याच्या दिवशी जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील व्यापारपेठ बंदच राहते. मात्र बंदच्या आवाहनानंतर लहान-मोठी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. देसाईगंजसह काही ठिकाणी शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. तसेच घोषणाही दिल्या.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढीचा निषेध : सरकारच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढती महागाई तसेच केंद्र शासनाचे धोरण यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनी सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. तान्हा पोळ्याच्या दिवशी जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील व्यापारपेठ बंदच राहते. मात्र बंदच्या आवाहनानंतर लहान-मोठी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. देसाईगंजसह काही ठिकाणी शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. तसेच घोषणाही दिल्या.गडचिरोली : गडचिरोली शहरात पेट्रोल व डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. सकाळच्या सुमारास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात निदर्शने केली. त्यानंतर बाजारपेठेत पायी फिरून बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सुरू असलेली दुकाने संबंधित दुकानदारांनी बंद केली. या बंद आंदोलनात माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादीच्या नेत्या जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम (हलगेकर), राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, पी. टी. मसराम, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे काशिनाथ भडके, डॉ. नितीन कोडवते, हरबाजी मोरे, राष्ट्रवादीचे विवेक बाबणवाडे, जगन जांभूळकर आदीसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी आमदार डॉ. उसेंडी, माजी खा. कोवासे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्रिमुर्ती चौकातील बाजारपेठ तसेच चंद्रपूर मार्गाने फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. दरम्यान इंदिरा गांधी चौकात काँग्रेस व राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करून पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या मुद्यावर विद्यमान भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा विरोध केला. सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात येथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.देसाईगंज : तालुका कॉंगे्रस कमिटीच्या वतीने देसाईगंज शहरात बंद पाळण्यात आला. नाकाडे पेट्रोलपंप ते फवारा चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. निषेध रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिक सहभागी झाले होते. सिलिंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. रॅलीदरम्यान केंद्र व राज्यशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. फवारा चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर टीका केली. वाढलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीमुळे महागाईत वाढ होत आहे. निवडणूकीपूर्वी नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रूपये टाकण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे असलेली रक्कमही कमी होत चालली आहे. असे मार्गदर्शन केले. मोर्चाचे नेतृत्व जेसा मोटवाणी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष परसराम टिकले, अ‍ॅड. संजय गुरू, ईश्वर कुमरे, प्रकाश समर्थ, नगरसेवक हरीष मोटवाणी, गणेश फाफट, महिला काँग्रेस अध्यक्ष आरती लहरी, शहजाद शेख, लतीफ रिझवी, नगरसेवक आरीफ खानानी, राष्टÑवादी काँग्रेसचे ओम शर्मा, श्याम धाईत, शैलेश पोटुवार, कावळे यांनी केले. यावेळी महादेव चांदेवार, वैशाली मेश्राम, जांभुळकर, सुभद्रा रामटेके, पुष्पा बोदेले, सुशीला गजभिये, गिता नाकाडे, असीम मेश्राम, आरती जांभूळकर, हेमा कावळे, महेश पुस्तोडे, नरेंद्र गजपुरे, नितीन राऊत, अरूण भुमलवार, रामदास गोडाणे, महादेव कुमरे, यादव ठाकरे, राजु रासेकर आदी उपस्थित होते.आष्टी : आष्टी शहरात बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व दुकाने, चहाटपरी, पानठेले बंद होते. पंचायत समिती सदस्य शंकर आक्रेड्डीवार, विनोद येलमुले, शंकर मारशेट्टीवार,कमला बामनवाडे, वर्षा कलाक्षपवार, आनंद कांबळे यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.सिरोंचा : सिरोंचा शहरातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. निवेदनावर पी. आर. तलांडी, रहीम शेख, सतीश भोगे, महाराज परसा, एस. आर. पुप्पलवार, शेख मुस्तफा, नरेश अलोणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.कुरखेडा : तालुका काँग्रेस कुरखेडाच्या वतीने सोमवारी बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विरोधात निदर्शने सुध्दा देण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आ.आनंदराव गेडाम, माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, महिला तालुका अध्यक्ष जयश्री धाबेकर, जि.प.सदस्य प्रल्हाद कराडे, प्रभाकर तुलावी, पं.स. सभापती गिरधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, नगरसेवक आशा तुलावी, मनोज सिडाम, उस्मान खान, काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष मनोहर लांजेवार, आनंदराव जांभुळकर, पुंडलिक निपाने, सरपंच संजय कोरेटी, टेमनशहा सयाम, उमाजी धुर्वे, टिकाराम कोरेटी, अनिराम बोगा, उपसरपंच राजीव होळी, रोहीत ढवळे, तुकाराम मारगाये, आसीफ शेख अशफाक खान, पं.स. सदस्य शारदा पोरेटी, सिंधू हलामी, मडावी, माधव दहिकर, प्रभाकर तितीरमारे, पांडुरंग लंजे, तानाजी कुमोटी, शेषराव नैताम, अगरसिंग खडाधार, गणपत उसेंडी, गिरीधर मुगंमोडे, पुंडलिक लांजेवार, दुर्योधन सहारे, प्रमीला हलामी, यशोदा कवडो, रेखा कापगते, लता कापगते, यशवदा हलामी, सुनिता कोरेटी, मंदा उईके, रेवता हलामी, मनोरमा हलामी, गिरीधर मुगंमोडे व काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.घोट : घोट येथेही काँग्रेसच्या वतीने बंद पाळण्यात आला. बसस्थानक चौकात केंद्र शासनचा जाहीर निषेध केला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते सजंय वडेट्टीवार, प्रवास शाहा, माजी उपसभापती माधव घरामी, डॉ. महेंद्र श्रुंगारपवार, गौरीशंकर वैरागडे, मधुकर वडेट्टीवार, समीर भोयर, अमित शाहा, रामचंद दूधबावरे, भातगिरणीचे अध्यक्ष वसंत दुधबावरे, मिलिंद दुधबावरे, पुरुषोत्तम अकपटलवार, गौर शाहा, राजू गोयल, आरिफ सय्यद, फयाज शेख, रवी चलाख, गुरुदास नवाते, गुरुदास वैरागडे, बंडू कुनघाडकर, मुरलीधर कुनघाडकर, विजय येनगंटीवार आदी उपस्थित होते.कोरची : कोरची येथे काँग्रेसच्या वतीने बंद पाळण्यात आला. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. महामागाईचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला. हातगाडीवर दुचाकी ठेवून तिला धक्का देऊन चालविले जात होते. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष शामलाल मडावी, मनोज अग्रवाल, कोरची पंचायत समिती सभापती कचरीबाई काटेंगे, उपसभापती श्रावण मातलाम, जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, सुमीत्रा लोहंबरे, प्रतापसिंग गजभिये, युवक कांग्रेस शहरअध्यक्ष राहूल अंबादे, धनराज मडावी, नगरसेविका शारदा नेताम, हर्षलता भैसारे, जगदीश कपूरडेहरीया, हकीमुद्दीन शेख, वशीम शेख, नालरपतसिंग नैताम, परमेश लोहंबरे, नारदसिंग कुंजाम, किताबसिंग टाटपलान, बाबुराव मडावी, पुरुषोत्तम हलामी, अविनाश होळी, प्रकाश होळी, अजय होळी, धरमसाय कोवाची, तुलराम मडावी, तुळशीराम बावनथळे, दानसाय कोवाची, सियराम गोटा, बळीराम मडावी, रुखमन घाटघुमर, मधुकर शेंडे, गोपाल मोहुर्ले, बंडु ढोरे, आनंद मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आरमोरी : आरमोरी येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका काँग्रेस अध्यक्ष किशोरवनमाळी, डॉ.नितीन कोडवते, अशोक वाकडे, अमोल मारकवार, डॉ. महेश कोपुलवार, अमिन लालानी, रघुनाथ मोगरकर, निलकंट सेलोकर, चंदू वडपल्लीवार, चंद्रकांत मेश्राम, मिलींद खोब्रागडे, मधू चौधरी, शालीक पत्रे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, जीवन ऊसेडी, प्रभाकर टेभुर्णे, देवराव चवळे, दिलीप घोडाम, निलेश अंबादे, अमिन शेख, हेमराज दामले, नरेंद्र गजभिये, दिलीप हाडगे, अनिल किरमे, निता दहीकार, सुमित सोनकुसरे, सचिन हेडावु, राकेश वाढगुरे, सुरज हनवते, गणेश पेटकुले, यश सोमनकर, महेश गिरडकर, यशंवत लोनारे, एकनाथ चापले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.धानोरा : पेट्रोल व डिझेलवाढीच्या विरोधात धानोरा येथे बंद पाळण्यात आला. यावेळी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मनोहर पोरेटी, मिलिंद किरंगे, नरेश भैसारे, कुलदीप इंदुरकर, भुषण भैसारे, दीपक मडावी, पुष्पराज उंदीरवाडे, पिंटू उंदीरवाडे, संजय म्हशाखेत्री, अश्विन सोरते, युवक म्हशाखेत्री, शुभम सालोटकर हजर होते.चहा टपऱ्याही बंदआधीच मारबत, तान्हा पोळ्यानिमित्त बाजारपेठ बंद राहते. त्यात पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे अनेक ठिकाणी चहा घेण्यासाठी एक टपरीही उघडी नव्हती. पानठेलेसुद्धा पूर्णपणे बंद होते. यामुळे अनेकांची फजितीही झाली.