या शिबिरात चंदू वडपल्लीवार यांनी सहकुटुंब रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला, तसेच पाणीपुरवठा सभापती सागर मने, अरविंद डुंबर यांनी स्वत: रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली. मनात कुठलीही भीती न बाळगता जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन सखी मंच सदस्य विद्या चव्हाण यांनी केले. रक्तदान शिबिरांसह अवयवदानासारख्या चळवळीही ‘लाेकमत’द्वारे राबविल्या जाव्यात, अशी विनंती त्यांनी लाेकमतला केली.
या शिबिरात नर्सिंगच्या एएनएम/जीएनएम विद्यार्थिनी, प्रशिक्षिका यांच्यासह युवारंग व वैरागड येथील शिवशाही ग्रुपच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान केले.
प्रास्ताविकात लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन यांनी लोकमत परिवार व रक्तदान शिबिर यासंबंधी भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन चंदा कन्नाके, तर आभार प्रदर्शन शिल्पा नारनवरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी लोकमत सखी मंच संयाेजिका रश्मी आखाडे, लाेकमतचे महेंद्र रामटेके, विलास चिलबुले, स्वप्निल धात्रक व भूषण ठकार, प्राचार्य नेहा ओलाख आदींनी सहकार्य केले, तसेच रक्त संकलनासाठी डाॅ. अभिजित मारबते, जनसंपर्क अधिकारी सतीश तडकलावार, तंत्रज्ञ विवेक घोनाडे, सूरज चांदेकर, राजेंद्र चौधरी, प्रतीक्षा काटेंगे आदींनी सहकार्य केले.
(बॉक्स)
‘लोकमत’च्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक
- काेराेनाकाळात महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयाेजन करून अनेकांना प्राणदान देण्याची माेलाची कामगिरी लोकमत परिवार करत आहे. भूकंप असाे की कोणतीही नैसर्गिक आपत्ती असाे, लाेकमत नेहमीच लाेकांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. बाबूजींचा हाच आदर्श समाेर ठेवून लाेकमत परिवाराची नवीन पिढीसुद्धा सामाजिक बांधीलकी जाेपासत असल्याचे प्रतिपादन यावेळी नगराध्यक्ष पवन नारनवरे यांनी केले.
- अध्यक्षस्थानावरून बाेलताना नर्सिंग स्कूलचे संचालक सुधाकर साळवे यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद करून लाेकमतद्वारे सुरू केलेल्या या महायज्ञात जास्तीत जास्त युनिट रक्त संकलित हाेऊन गरजूंना लाभ मिळावा, अशी आशा व्यक्त केली. तसेच एएनएम, जीएनएम प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त सहभागाचे आराेग्य सभापती भरत बावने यांनी कौतुक केले.
(बॉक्स)
यांनी केले रक्तदान
प्रवीण दुमाणे, सुषमा कोतकोंडावार, समीर चिंचोडकर, चंदू वडपल्लीवार, नंदू वडपल्लीवार, प्राची नंदू वाडपल्लीवार, प्रीतम धोंडणे, सागर मने, साई कापकर, भूषण कठारे, जगदीश बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, उमेश पिंपळकर, अवी डुंबरे, गायत्री अवी डुंबरे, गणेश चलीवार, संजय बाबुराव सातपुते, रेषमा तिरंगम, मनीष खोब्रागडे, रोहित रमेश बनकर, इंद्रायणी औरासे, शरद हिरालाल अतकरे, प्राची ठाकरे, डॉ. अमित साळवे, सौंदर्या दुर्गम, गायत्री नेवारे, दीक्षा दिनकर तिम्मा आदींनी या शिबिरात रक्तदान केले.
(बॉक्स)
आज चामोर्शी येथे रक्तदान शिबिर
चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवार दि. ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र झाडे राहणार असून उद्घाटन पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी आदी उपस्थित राहतील. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने रत्नाकर बोमिडवार, लोमेश बुरांडे, रोशन थोरात, पांडुरंग कांबळे, मिलिंद मेडपीलवार, तसेच सखी मंच तालुका संयोजिका सोनाली पालारपवार आणि गणेश व दुर्गा मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.
050721\img_20210705_195026.jpg
रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष पवन नारनवरे