शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लोकमत सखीमंच सदस्यांचा वृक्षारोपणात उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: July 02, 2016 1:28 AM

लोकमत सखी मंचाने राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात पाच हजारावर अधिक वृक्षांची लागवड शुक्रवारी केली.

गडचिरोली : लोकमत सखी मंचाने राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात पाच हजारावर अधिक वृक्षांची लागवड शुक्रवारी केली. गडचिरोली येथील वन विभाग कार्यालयाच्या बाजुला सीसीएफ डेपो पोटेगाव चांदाळा रोड येथे सकाळी ११ वाजता उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, वन परिक्षेत्राधिकारी एम. पी. चांगले, डेपोचे वन परिक्षेत्राधिकारी यू. के. माणुसमारे, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी सखी संयोजिका प्रिती मेश्राम, किरण पवार, वर्षा पडघन, सोनिया बैस, सहायक वन परिक्षेत्राधिकारी नाईकवाडे, घोंगले, कुळमेथे, भांडेकर, हजारे, गुरपुडे, बैस, धात्रक, डी. डी. दिकोंडवार, भारती खोब्रागडे, रोहिणी मेश्राम, सुनिता उरकुडे, उज्ज्वला साखरे, उषा भानारकर, पुष्पलता देवकुले, पुष्पा पाठक, अंजली वैरागडवार, शारदा खंडागळे, वंदना दरेकर, उर्मिला गुरपुडे, सुनिता गुज्जनवार, भारती येनगंटीवार, उमरे, गावड, आशा खांडेकर, गहाणे, करंबे, निळा निंदेकर, मुनगंटीवार, सजनपवार, मोंगरकार, कन्नाके, मसराम उपस्थित होते.लोकमत सखीमंच आष्टीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी ग्रामीण रूग्णालय परिसरात राबविण्यात आला. भर पावसात सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. यावेळी संयोजिका प्रज्ञा फरकाडे, विजया सालुरकर, विजया पंदिलवार, लता रामटेके, ललीता आत्राम, प्रतिभा पेचे, सुमित्रा बिश्वास उपस्थित होत्या. वृक्षामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होत असल्याने नागरिकांनी वृक्षारोपण करून याचे संवर्धन करावे, असे आवाहन प्रज्ञा फरकाडे यांनी केले. लोकमत सखी मंच वैरागडच्या वतीने शुक्रवारी भंडारेश्वर देवस्थान तसेच नदी लगतच्या पेट्रोल पंपाजवळून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वर्षा चौधरी, आशा भारती, अस्मिता लोखंडे, संध्या बुध्दे, दुशिला लाडे, संगीता पेंदाम, निर्मला क्षीरसागर, अंजली कोसे, सरिता कावळे, नूतन लाऊतकर, विद्या खडसे, अनुजा श्रीप्रेमवार, जोत्स्ना बोडणे, मनीषा राऊत, विभा आंबोरकर, वर्षा धाईत, रूपा ठाकरे, मनीषा चाकडे, संध्या नागोसे व सदस्य उपस्थित होते.लोकमत संखी मंच मुलचेराच्या वतीने विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी संयोजिका स्मिता चापले, योगीता देवतळे, लता गुडपल्ले, बोडावार, मुद्रालवार, बिश्वास, मुहार, गजभिये व विद्यार्थी उपस्थित होते. लोकमत सखी मंच अहेरीच्या वतीने किष्टापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी उपवनसंरक्षक जगताप, क्षेत्र सहायक तोंबर्लावार उपस्थित होते. लोकमत सखीमंच आरमोरीच्या वतीने वैरागड मार्गावरील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका संयोजिका सुनिता तागवान, रंजीता राऊत, रोशनी बैस, रत्ना बोरकर, सुरेखा गोंदोळे, संगीता दुमाने, कल्याणी चंदेल, वैशाली दोडके, सायली पोफडी, मिनाक्षी गेडाम, मिना डिडरे, निता दुर्गे, लता बारसागडे, सिंधू कापकर, गौरी पटले, अनिता मोटघरे, रोडगे उपस्थित होत्या. वृक्षारोपण कार्यक्रमाला वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांचे सहकार्य लाभले.घोट येथे वृक्षारोपण कार्यक्रमाला आलापल्लीचे उपवनसंरक्षक पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन करून वृक्षारोपण झाले. यावेळी जि.प. सदस्य संध्या दुधबळे, पं.स. सभापती मंदा दुधबावरे, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, लोकमत सखी मंचच्या संयोजिका आशा पेटकर, प्रतीक्षा पाटील, मुमताज सय्यद, अनिता नंदूरकर, अश्विनी वडेट्टीवार यांच्यासह नागरिक व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)