लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली जिल्हा पोलीस दल व पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने २१ जुलै रोजी रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी येथे आदिवासी विकास दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुले, मुली मिळून एकूण ११४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर व डॉ. दोरखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौड स्पर्धेचा शुभारंभ केला. याप्रसंगी पोलीस उपनिरिक्षक निशा खोब्रागडे, दिनेश लिलारे, शिक्षक मोरेश्वर गडकर, दीपक सोमनकर, राकेश खेवले, अविनाश तालापल्लीवार, हर्षा रंधये, कालिदास बन्सोड, लोमेश बुरांडे, पोलीस हवालदार शामराव वडेट्टीवार, दिलीप सोनवने, संदीप भिवनकर, खुशाल कोसनकर, हिराचंद झाडे, दुलाल मंडल, ज्ञानेश्वर लाकडे, जोगेश्वर वाकुडकर, शालिकराव गिरडकर, देवाजी धकाते, गिरू साखरे, निलकंठ कोकोडे, भास्कर अगाड, रजनिश पिल्लेबन आदी उपस्थित होते.यावेळी मुलांमधून अनुक्रमे पाच व मुलींमधून अनुक्रमे पाच अशा १० विजेत्या स्पर्धकांची निवड करून त्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व एक रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राकेश खेवले यांनी केले तर आभार पोलीस उपनिरिक्षक निशा खोब्रागडे यांनी मानले. बक्षिस वितरण पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे जवान, ग्रामीण रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. स्पर्धेदरम्यान शहरातील नागरिक व विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.या विजेत्या स्पर्धकांचा झाला गौरवचामोर्शी येथे घेण्यात आलेल्या आदिवासी विकास दौड स्पर्धेत मुलांमधून अनुक्रमे पाच विजेत्यांची निवड करण्यात आली. मुलांची तीन किमी अंतराची दौड स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांमध्ये शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी भूषण मेश्राम, विश्वशांती विद्यालय भेंडाळाचा विद्यार्थी सौरभ आभारे, जा.कृ. बोमनवार विद्यालयाचा हर्षल कावटवार, विश्वशांती विद्यालयाचा साहिल अनिल कारडे व जि.प. हायस्कूलचा आशिष मडावी आदींचा समावेश आहे. मुलींच्या दोन किमी दौड स्पर्धेत पाच विजेते स्पर्धक निवडण्यात आले. यामध्ये जा.कृ. बोमनवार विद्यालयाची रिया दुधबळे, कृषक हायस्कूलची पायल दुधबळे, विश्वशांती विद्यालय भेंडाळाची विद्यार्थिनी स्नेहा चौधरी व वैष्णवी मंगर आदींचा समावेश आहे. यशस्वी स्पर्धक विजेत्यांचे पोलीस विभागाने कौतुक केले आहे.
आदिवासी दौड स्पर्धेला उत्स्फूर्त प्र्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:05 AM
गडचिरोली जिल्हा पोलीस दल व पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने २१ जुलै रोजी रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी येथे आदिवासी विकास दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुले, मुली मिळून एकूण ११४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
ठळक मुद्देजिल्हा पोलीस दल व पोलीस ठाण्याचा पुढाकार : चामोर्शीत ११४ विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग