आॅनलाईन लोकमततळोधी (मो.) : केंद्रस्तरीय क्रीडा व कला संमेलनास प्राप्त होणारा १५ हजार रूपयांचा निधी हा अत्यल्प असून तो अपुरा पडतो. तीन दिवशीय केंद्रस्तरीय या संमेलनाचा सर्व खर्च एवढ्याशा निधीत भागविणे अशक्य आहे. याबाबतची जाणीव केंद्रप्रमुखांनी आपल्याला करून दिली. सदर बाब आपण गांभीर्याने घेतली असून पुढील वर्षापासून केंद्रस्तरीय क्रीडा व कला संमेलनासाठीचा निधी वाढवून देऊ, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिले. तळोधी केंद्राअंतर्गत विसापूर येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या मैदानावर बुधवारी केंद्रस्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सदस्य रेखा नरोटे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विसापूरच्या सरपंच जयश्री दुधबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू नरोटे, पोलीस पाटील मंदा पेंदाम, पं.स. चे माजी उपसभापती केशव भांडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी एन.पी. पाटील, आमगाव पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, सोमनाथ पिपरे, येडानूरचे सरपंच संतोष पदा, कोमल पातर, विलास पातर, सुधाकर घुमडेलवार, किशोर कुनघाडकर, पीतांबर डोंगरे, गुरूदास पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक नरोटे, विकास मेश्राम, शेख, जीवन पेंदाम, वसंत कोवाची आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकावून क्रीडा संमेलनाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यापूर्वीच्या स्पर्धेतील विजेता मुरमुरी व उपविजेता पावीमुरांडा संघाच्या विद्यार्थ्यांनी मशाल पूर्ण करून मैदानात संचालन केले. त्यानंतर ही मशाल उद्घाटक मान्यवरांकडे सुपूर्द केली. तळोधी जि.प. केंद्रशाळा भाडभिडी व मुरूमुरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट झांकी सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.मुरमुरी व भाडभिडी या दोन शाळांच्या संघामध्ये कबड्डी हा उद्घाटनीय सामना पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, संचालन व आभार प्रशांत वनकर यांनी केले. यशस्वीतेसाठी ओमप्रकाश बोमनवार, संजय तुमराम, प्रशांत कन्नाके, हरीदास कुंभारे, अतुल कुनघाडकर, जयंत वनकर, नरेश जाम्पलवार, करमचंद भोयर, रत्नप्रभा कोमरेवार, पुष्पा मेश्राम आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.
क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:39 PM
केंद्रस्तरीय क्रीडा व कला संमेलनास प्राप्त होणारा १५ हजार रूपयांचा निधी हा अत्यल्प असून तो अपुरा पडतो. तीन दिवशीय केंद्रस्तरीय या संमेलनाचा सर्व खर्च एवढ्याशा निधीत भागविणे अशक्य आहे.
ठळक मुद्देयोगीता भांडेकर यांचे आश्वासन : केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन