एस. टी. सूर यांचे प्रतिपादन : न्यायालयात विधीसेवा दिवसगडचिरोली : नागरिकांना कायद्याविषयी अधिक माहिती व्हावी. त्यांना विधीसेवेचा लाभ व्हावा, या करिता विधीसेवेचे फायदे, विधीसेवेचे कार्य व विधीसेवा प्रक्रिया याबाबत माहिती द्यावी, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश श्रेणी-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. सूर यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात आयोजित विधीसेवा दिवस कार्यक्रमात केले. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक शिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानाहून न्यायाधीश सूर बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. ता. के. जगदाळे, अतिरिक्त सहदिवाणी न्या. एन. पी. वासाळे व पक्षकार उपस्थित होते. कायदेविषयक शिक्षण शिबिरात विधीसेवेच्या फायद्यासह विधीसेवा प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विधीसेवेबाबत मार्गदर्शन करताना याचा लाभ देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके तर आभार कनिष्ठ लिपीक एन. डी. लोंढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कायदेविषयक शिक्षण शिबिराला पक्षकार व कर्मचारी उपस्थित होते.
विधीसेवेचे फायदे जनतेत पोहोचवा
By admin | Published: November 10, 2016 2:32 AM