शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

भाजपचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:57 PM

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने पारदर्शक व गतिमान प्रशासन दिले आहे. शिवाय विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्यान्वित केल्या आहेत.

ठळक मुद्देएटापल्लीत बैठक : अशोक नेते यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने पारदर्शक व गतिमान प्रशासन दिले आहे. शिवाय विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्यान्वित केल्या आहेत. भाजप सरकारने केलेले काम जनतेपुढे मांडून एटापल्ली तालुक्याच्या प्रत्येक घराघरात भाजपचे ध्येयधोरण प्रभाविपणे पोहोचवा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी केले.गुरूवारी एटापल्लीच्या शासकीय विश्रामगृहात भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अहेरी विधानसभा विस्तारक प्रकाश गेडाम, डॉ. भारत खटी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष नवीन बालाजी, विनोद अकनपल्लीवार, बाबुराव गम्पावार, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा महामंत्री जावेद अली आदी उपस्थित होते. याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी तालुक्यातील भाजपाच्या सर्व आघाड्यांचा आढावा घेतला. तालुका कार्यकारिणी बनविण्याच्या सूचना सर्व आघाडी प्रमुखांना दिल्या. पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, भाजप सरकार हे सर्वसामान्य गोरगरीबांसाठी काम करीत आहे. मागेल त्याला घरकूल, मागेल त्याला सिंचन विहीर, मागेल त्याला शेततळे या वैयक्तिक लाभाच्या योजनांसह मुद्रा लोण, सुकन्या, बेटी अचाओ, बेटी पढाओ आदी योजना गतिमानतेने राबवित आहे. शिवाय भाजप सरकारच्या काळात एटापल्ली तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत, असेही खा. नेते यावेळी म्हणाले. याप्रसंगी बाबुराव कोहळे यांनी भाजप पक्ष संघटनेबाबत मौलिक मार्गदर्शन केले. बैठकीला तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.