लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.मागील १५ दिवसांत भामरागड शहरात तब्बल तीन वेळा पर्लकोटा नदीचे पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. छत्तीसगड राज्यातील धरणाचे पाणी इंद्रावती नदीला सोडल्याने पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन मंगळवारी रात्री तिसऱ्यांदा भामरागडात पाण शिरले. शुक्रवारी सकाळी पूर ओसरला. पुरामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे चिखल निर्माण झाले आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांच्याही घरात गाळ साचला आहे. सतत तीन दिवस पाणी साचून राहिल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नागरिकांनी आपापले घर गाठून सामान काढण्यास सुरूवात केली आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मोलमजुरी करणाºया नागरिकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेती सोडून सुरू आहे घराची डागडुजीपुरामुळे सामान्य नागरिक, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. ही कामे सोडून घराची डागडुजी करण्यात नागरिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पूराच्या पाण्यात साहित्य सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे, अशी मागणी होत आहे. भामरागड शहर पर्लकोटा नदीच्या अगदी काठावर वसले आहे. इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पर्लकोटाला दाब निर्माण होते. त्यामुळे पर्लकोटाचे पाणी भामरागड शहरात शिरते. त्यामुळे नुकसान होते.
भामरागडातील रस्त्यांवर पसरला चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:11 AM
तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । तीन दिवसानंतर पूर ओसरला; पुरात सापडलेल्या घरांची झाली पडझड; साहित्याचेही नुकसान