लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : फेब्रुवारी ते मार्च या दाेन महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ९२२ फायर अलर्ट प्राप्त झाले आहेत. यामध्ये २ हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील जंगलालाआग लागली आहे. आगीमुळे जैवविविधतेचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. गडचिराेली जिल्ह्यात माेहाची झाडे माेठ्या प्रमाणात आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून माेहाफुले पडण्यास सुरुवात हाेते. त्यापूर्वी पानझड झाली असल्याने झाडाखाली माेठ्या प्रमाणात पाने जमा हाेतात. या पानांना आग लावली जाते. त्यामुळेच मार्च महिन्यात आगीच्या सर्वाधिक घटनांची नाेंद होते. विशेष म्हणजे ही आग पुढे कित्येक हेक्टर क्षेत्रावरील जंगलात पसरते. आगीमुळे लहान राेपटी नष्ट हाेतात. तसेच वन्यजीव, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटे नष्ट हाेतात. याचा फार माेठा फटका जैवविविधतेला बसतो.
जागृती करूनही लावतात आगीमाेहाच्या झाडाखाली लावलेली आग पुढे जंगलात पसरते. यामुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान हाेते. लाेकांनी आग लावू नये, याबाबत वनविभागामार्फत दरवर्षी जागृती केली जाते. झाडाखालील पालापाचाेळा झाडून दूर केले तरीही माेहाफुले वेचता येतात. मात्र, नागरिक असे न करता थेट आगी लावतात.
सॅटेलाईट अलर्टने माेठी मदत- एखाद्या ठिकाणी आग लागल्यास याबाबतचा संदेश सॅटेलाईटमार्फत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविला जाते. हा संदेश पुढे ज्या वनक्षेत्रात आग लागली आहे तेथील वनकर्मचाऱ्याला पाठविला जातो. त्यानंतर वनकर्मचारी त्या ठिकाणी पाेहाेचून आग विझवितात. सॅटेलाईटच्या संदेशामुळे आग वेळीच विझविणे शक्य झाले आहे.
वणवा लावणाऱ्यांवर कारवाईची गरज- जे नागरिक जाणूनबुजून आग लावतात, अशांवर कारवाई करणे गरजेचे आहे. कारवाई हाेत नसल्याने नागरिक आगी लावतात. यानंतर आता तेंदूपत्त्यासाठी आगी लावल्या जाणार आहेत. काही लाेकांवर कारवाई झाल्यास जंगलांना खुलेआम आगी लावण्याच्या प्रकाराला आळा बसेल. तसेच जे आगी लावतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.
मागील वर्षीच्या तुलनेत कमी फायर अलर्टवनविभागाने ३१ मार्च राेजी आढावा घेतला असता, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फायर अलर्टची संख्या निम्म्याहून कमी असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ३१ मार्चपर्यंत १६ हजार ९९१ फायर अलर्ट प्राप्त झाले हाेते. यावर्षी फायर अलर्टची संख्या ६ हजार ९२२ एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १० हजार ६९ फायर अलर्ट कमी आहेत.