जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : सभेत २१ स्वयंसेवकांचा घेतला आढावागडचिरोली : समाजात काम करतांना राष्ट्रीय युवा स्वंयसेवकांनी शासनाच्याविविध योजनांविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून ती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शनिवारी केले.स्थानिक नेहरु युवा केंद्राच्या एकूण २१ राष्ट्रीय युवा स्वंयसेवकांची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतानाजिल्हाधिकारी बोलत होते. सभेला जिल्हा युवा समन्वयक शरद साळुंखे, लेखापाल अखिलेशप्रसाद मिश्रा तसेच जिल्ह्यातील १२ तालुक्यांचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक उपस्थित होते. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, स्वयंसेवकांनी आपल्या तालुक्यात काम करतांना तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांशी संपर्क ठेवून विविध शासकीय योजना तसेच शासकीय उपक्रम समाजात राबविण्यासाठी सहकार्य करावे. आगामी पालिका, पं. स., व जि. प. निवडणुकीत सहभाग घेऊन मतदारांना जागृत करावे. दरम्यान जिल्हा युवा समन्वयक शरद साळुंखे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत प्रत्यक्ष समाजात काम करीत असतांना येणाऱ्या अडीअडचणीचा आढावा घेतला. संचालन प्रमोद भोयर तर आभार नितेश दाकोटे यांनी मानले.
योजना समाजात पोहोचवा
By admin | Published: November 06, 2016 1:39 AM