लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सध्या चामोर्शी तालुक्यातील धानपीक गर्भात असून शेवटच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडण्यात आले आहे. आ. डॉ. देवराव होळी यांनी भेंडाळानजीकच्या कालव्याला भेट देऊन पाणीपुरठ्याची पाहणी केली. दरम्यान दिना पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी शेवटच्या शेतकºयापर्यंत पाणी पोहोचवावे, अशा सूचना त्यांनी केल्या.आ. डॉ. देवराव होळी यांनी भेंडाळा क्षेत्रातील शेतकºयांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली व सिंचनाची समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दिना पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दुमने, अभियंता लांडगे, सुरपाम यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, सुरेश कोहपरे, साहिल तुंबळे, अमोल तिवाडे, साईनाथ चुधरी, ईश्वर चुधरी तसेच शेतकरी उपस्थित होते. भेंडाळा परिक्षेत्रात पाण्याचा स्तर कसा वाढेल, या दृष्टीने अधिकाºयांनी नियोजन केले पाहिजे, असे आ. डॉ. होळी यांनी यावेळी सांगितले.
शेवटच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 1:20 AM
सध्या चामोर्शी तालुक्यातील धानपीक गर्भात असून शेवटच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडण्यात आले आहे.
ठळक मुद्देआमदारांचे अभियंत्यांना निर्देश : कालव्याला दिली भेट