सिरोंचा : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालेश्वर मंदिरातील श्रीमुक्तेश्वर स्वामी मंदिर बुधवार दि.२८ पासून ५ मेपर्यंत देवदर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीचे ई. ओ. मारुती यांनी दिली.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील प्रसिद्ध श्रीकालेश्वर-श्रीमुक्तेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे कोरोनाचे विषाणू पसरू नयेत म्हणून मंदिर प्रवेश बंद करण्याची सूचना तेलंगणा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार दररोज सकाळी-संध्याकाळी दैनंदिन पूजाविधी मंदिर पुजारी करतील. पण भाविकांना प्रवेश राहणार नाही. आतापर्यंत मंदिराचे एक पुजारी व दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तसेच कालेश्वर गावात ५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.