शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘एसटी’मुळे सर्वसामान्यांना दिलासा, पण गृह विलगिकरणाच्या अटीमुळे वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देआंतरजिल्हा वाहतूक : जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यावर द्यावे लागणार हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झालेल्या एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू दुसऱ्या जिल्ह्यातून बसने प्रवास करून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस विलगीकरण कक्षात राहणे सक्तीचे करणारा आदेश गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील अडलेली कामे मार्गी लागणार असल्यामुळे अनेकांनी एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे. कोणत्या अटीशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश जिल्ह्यात प्रवेश दिल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकते. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून एसटीने प्रवास करणाऱ्याला १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी काढली आहे.अधिसूचनेत म्हटले आहे की, सध्यास्थितीत जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच बसफेऱ्या सुरू कराव्यात. लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाही. बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल.बसमध्ये सॅनिटायझर असणे आवश्क आहे. प्रवाशाने तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय बसमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवाशाने आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनी हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. हे हमीपत्र एसटी वाहकाकडे उपलब्ध राहणार आहेत. सदर हमीपत्र आरमोरी, देसाईगंज, पारडी, आष्टी, हरणघाट, कोरची या चेकपोस्टवर जमा केले जाईल. या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. तर रेडझोन व हॉटस्पॉट मधून येणाऱ्या प्रवाशाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.संबंधीत प्रवाशी खरच विलगीकरणात आहे काय याची खातरजमा तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे.नागपूर व चंद्रपूरसाठी १६ फेऱ्याआंतरजिल्हा वाहतूकीला गुरूवारपासून परवानगी दिल्यानंतर गडचिरोली आगारातून नागपूर व चंद्रपूरसाठी प्रत्येकी आठ फेºया सोडण्यात आल्या. मात्र पहिलाच दिवस असल्याने एसटीला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशी मिळाले नाही. पहिला दिवस असल्याने नियोजन करताना एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. तरीही चंद्रपूर, नागपूरसाठी बसफेऱ्या सोडण्यात आल्या. अहेरी आगारातून काही बसफेऱ्या चंद्रपूर व नागपूरसाठी सुटल्या.विलगीकरणाच्या अटीचा बसणार फटकादुसºया जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. याबाबतचे हमीपत्र व संबंधित प्रवाशाची माहिती जिल्ह्यावरील चेकपोस्टवर जमा केली जाणार आहे. एखाद्या नागरिकाला दुसऱ्या जिल्ह्यात काम असले तरी परत येताना त्याला गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची हिंमत करणार नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकही गडचिरोली जिल्ह्यात येणार नाहीत. एकंदरीतच गृहविलगीकरणाच्या अटीमुळे एसटीला अपेक्षित प्रवासी मिळतील का, याबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी