लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बसमधील एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. केंद्र शासनाने १७ मे पर्यंत संचारबंदी वाढविली असल्याने तोपर्यंत संचारबंदी कायम राहिल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.गडचिरोली जिल्ह्यात आता तेलंगणा, आंध्रप्रदेश, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या कोरोनाबाधीत प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मजूर गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. यामध्ये काही मजूर किंवा नागरिक कोरोनाबाधीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा पुढील प्रमाणेच सुरू राहिल. प्रशासनामार्फत देण्यात येणाºया सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. जेणे करून गडचिरोली जिल्हा कोरोनापासून भविष्यातही मुक्त ठेवण्यास मदत होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.बसस्थानक तसेच बसमध्ये प्रवास करताना नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे. दोन प्रवाशांपासून शारीरिक अंतर राहिल, अशा पध्दतीने प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित बसच्या वाहकावर राहणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धावणार एसटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 2:31 PM
गडचिरोली जिल्ह्यात बसमधील एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. केंद्र शासनाने १७ मे पर्यंत संचारबंदी वाढविली असल्याने तोपर्यंत संचारबंदी कायम राहिल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
ठळक मुद्देअटी घालून जिल्हाधिकाऱ्यांची मान्यताअजून दोन आठवडे सहकार्य करण्याचे आवाहन