लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय वेतन निश्चिती समिती नेमली होती. या समितीने एसटी कर्मचाऱ्यांना केवळ दीड टक्का वाढ दिली आहे. यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाºयांनी गुरूवारी गडचिरोली बसस्थानकात समितीच्या वेतन अहवालाची होळी केली.वेतनवाढ देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी १७ ते १९ आॅक्टोबर दरम्यान ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर संपाची हत्यार उपसले होते. त्यानंतर राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने एकूण ५.५ टक्के वेतनवाढ दर्शविले आहे. मात्र एचआरए भत्ता १० टक्केवरून ७ टक्के केला आहे. तर वार्षिक वेतनवाढ ३ टक्केवरून २ टक्के केली आहे. याचा अर्थ प्रत्यक्षात एसटी कर्मचाऱ्यांना केवळ दीड टक्का वेतनवाढ मिळणार आहे. त्याचबरोबर वेतनवाढ करारानुसार १ एप्रिल २०१६ पासून लागून होता. जानेवारी २०१८ पासून लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सर्व बाबींमुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी उच्चस्तरीय वेतन निश्चिती समितीच्या अहवालाची होळी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रकाश इटनकर, नगरसेवक सतीश विधाते, शंकरराव सालोटकर, एसटी कर्मचारी सुनिल खोब्रागडे, लक्ष्मीकांत चौधरी, राजू चौधरी, विलास भुरसे, देवराव राठोड, गजानन कोडापे, आनंद पिपरे, मिथून भगत, हरदयाल मजोके, रवींद्र उईके, लेंबाडे आदी हजर होते.
एसटी कर्मचाऱ्यांनी केली वेतन अहवालाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:48 PM
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय वेतन निश्चिती समिती नेमली होती. या समितीने एसटी कर्मचाऱ्यांना केवळ दीड टक्का वाढ दिली आहे.
ठळक मुद्देकर्मचारी संतप्त : प्रत्यक्षात केवळ दीड टक्का वेतनवाढ