काेराेनामुळे एसटीची प्रवासी वाहतूक सेवा मागील वर्षभरापासून चांगलीच प्रभावित झाली आहे. काेट्यवधी रुपयांच्या बसेस आगारात उभ्या आहेत, तर चालक व वाहकांना घ बसल्या पगार माेजावा लागत आहे. यामुळे एसटीची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. मात्र याच कालावधीत एसटीने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून एसटीला बऱ्यापैकी उत्पन्न मिळून एसटी थाेड्याफार प्रमाणात सावरण्याचे काम करीत आहे. मात्र एसटी ट्रकचालकांच्या समस्यांकडे एसटी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
बाॅक्स
काेराेनाकाळात ६० लाखांची कमाई
-गडचिराेली विभागातून पहिली एसटी ट्रक २८ मे २०२० राेजी माल घेऊन मार्गस्थ झाली. जवळपास वर्षभराच्या कालावधीत ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
- गडचिराेली विभागाकडे एकूण १५ ट्रक आहेत.
-सर्वाधिक उत्पन्न ब्रम्हपुरी आगारातून प्राप्त हाेते. त्यामुळे याच आगारात सर्वााधिक ट्रक आहेत.
बाॅक्स
परतीचा माल मिळेपर्यंत मुक्काम
माल घेऊन गेलेल्या ट्रकला ४८ तासांपर्यंत माल उपलब्ध हाेणार असेल, तर संबंधित चालकाला त्याच ठिकाणी ठेवले जाते. जर या कालावधीत माल उपलब्ध हाेणार नसेल, तर ताे ट्रक जवळपासच्या आगारात ठेवून चालकाला परत बाेलाविले जाते.
बाॅक्स
नाईट भत्ता म्हणून दिले जातात केवळ १०० रुपये
-मुक्काम करण्याची वेळ आली, तर महानगरपालिका क्षेत्रात १०० रुपये, जिल्हास्तरावर ८० रुपये व ग्रामीण स्तरावर ७५ रुपये नाईट भत्ता दिला जातो. वाढलेल्या महागाईनुसार भत्त्यात वाढ करण्याची गरज आहे.
- रनिंगभत्ता म्हणून १५० किमीपर्यंत फक्त चार रुपये दिले जातात; तर १५० ते २०० किमीपर्यंत ९ पैसे प्रतिकिमी २०० ते २२५ किमीपर्यंत १५ पैसे, २२५ किमीच्यावर २० पैसे प्रतिकिमी एवढा भत्ता दिला जाते.
काेट
वर्षभरात गडचिराेली विभागाला मालवाहतुकीतून सुमारे ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरानुसार चालकांना माेबदला दिला जातो.
अशाेककुमार वाडीभस्मे, विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय एसटी कार्यालय, गडचिराेली
बाॅक्स
चालक काय म्हणतात
कपंनीमध्ये ट्रक लावून रात्रभर त्याच ठिकाणी झाेपावे लागते. त्यामुळे झाेप हाेत नाही. परिणामी वाहन चालविताना अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालकाला देय असलेल्या भत्त्यांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.
चालक
मालवाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रक जुन्या आहेत. प्रवाशांचे वजन जास्तीत जास्त २ ते ३ टन एवढे राहते. आता या गाड्यांमध्ये जवळपास १० टन माल भरला जात आहे. त्यामुळे त्या पिकअप पकडत नाहीत.
चालक