शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

सलग दुसऱ्याही वर्षी पंढरपूरच्या वारीला मुकणार ‘एसटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:24 AM

गडचिराेली : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दरवर्षी जमणारा भक्तांचा मेळा यावर्षीही दिसणार नाही. कोरोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात ओसरली ...

गडचिराेली : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दरवर्षी जमणारा भक्तांचा मेळा यावर्षीही दिसणार नाही. कोरोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात ओसरली असली तरी खबरदारी म्हणून यात्राच रद्द केल्याने सर्व जिल्ह्यांतून सोडल्या जाणाऱ्या एसटीच्या ४ हजार विशेष बसफेऱ्या यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढीला भाविकांना आपापल्या घरी बसूनच मनोमन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून पंढरपूरच्या यात्रेची ओळख आहे. यावर्षी ही यात्रा ११ ते २४ जुलै यादरम्यान हाेणार हाेती. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली. राज्यभरातील काही निवडक दिंड्यांच्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील काैंडण्यपूर येथील दिंडीचा समावेश आहे.

साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पाेलीस आयुक्त व जिल्हा पाेलीस अधीक्षकांना पत्र पाठवून पंढरपूरकडे येणाऱ्या वाऱ्यांना परवानगी देऊ नये, विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर ११ ते २८ जुलै या काळात दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. पंढरपूर येथे पाच दिवसांची संचारबंदी लागू केली जाणार आहे, असे पत्रातून कळविले आहे. त्यानुसार गडचिराेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एसटीच्या विभाग नियंत्रकांना पत्र लिहिले असून, त्यात वारीसाठी बस उपलब्ध करून दिली जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

(बॉक्स)

एसटीसाठी सर्वात माेठी यात्रा

पूर्व विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या कमी असली, तरी हजाराे वारकरी बसने पंढरपूरला जात हाेते. पश्चिम महाराष्ट्र व साेलापूर परिसरातील आगारांच्या बस पंढरपूरच्या यात्रेसाठी साेडल्या जातात. त्यांच्याकडे असलेल्या बस कमी पडत असल्याने पूर्व विदर्भातील प्रत्येक आगारातून १० ते १५ बस आणि चालक व वाहक मागविले जात हाेते. काेराेनामुळे गेल्यावर्षी आणि यावर्षीही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटी महामंडळासाठी सर्वाधिक उत्पन्न देणारी आणि मोठी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी घडत नसल्यामुळे भाविकांसह एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही हुरहुर लागली आहे.

030721\03gad_1_03072021_30.jpg

03gdph08.jpg