तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांना निधीच्या अडचणींमुळे थकीत बिलाचा भरणा करण्यात उशीर झाला. त्यामुळे अनेक गावातील सार्वजनिक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी गावातील नळ पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या. तसेच ऐन पावसाळ्यात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बिलाचा भरणा करण्यास मंजुरी प्रदान करीत सार्वजनिक विद्युत पुरवठा खंडित न करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा लवकर पूर्ववत करावा तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वीज बिलाचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिला.
230721\img_20210722_235159.jpg
फोटो सूरेन्द्रसिंह चंदेल शिवसेना जिल्हा प्रमूख