लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी-सिरोंचा मार्गाची गुड्डीगुडमदरम्यान दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील आठ दिवसांपासून या ठिकाणी डांबर टाकले जात आहे. अहेरी-सिरोंचा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ राहते. मात्र सदर मार्ग मागील अनेक वर्षांपासून दुरूस्त केला नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. परिणामी वाहनधारक कमालीचे त्रस्त होते. सदर मार्ग दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून झाल्यानंतर बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरूस्तीला सुरुवात केली आहे. मार्गावर डांबर टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मार्गाचे नुतनीकरण केले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांसाठी सोयीचे होणार आहे.सदर मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामाला सुरुवात होण्यास विलंब असल्याने सदर मार्गाची दुरूस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सिरोंचा मार्गाची दुरूस्ती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:37 PM
अहेरी-सिरोंचा मार्गाची गुड्डीगुडमदरम्यान दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील आठ दिवसांपासून या ठिकाणी डांबर टाकले जात आहे. अहेरी-सिरोंचा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ राहते. मात्र सदर मार्ग मागील अनेक वर्षांपासून दुरूस्त केला नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.
ठळक मुद्देडांबरीकरण करा : मागील अनेक वर्षानंतर नूतनीकरण