लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बोदली येथील नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी हे महाविद्यालय पूर्ववत सुरू करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे याच महाविद्यालयात वर्ग व परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या चालविणे अशक्य असल्याचे कारण पुढे करून व्यवस्थापनाने मागील वर्षीपासून महाविद्यालयात वर्ग घेणे बंद केले. येथील विद्यार्थ्यांच्या वर्गाची सोय चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात केली होती. स्कॉलरशीप मिळत नसल्याने महाविद्यालय आर्थिक अडचणीत आले आहे. स्कॉलरशीप मिळाल्यानंतर महाविद्यालय पूर्ववत सुरू केले जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने मागील वर्षी विद्यार्थ्यांना दिले होते. चंद्रपूर येथील महाविद्यालयात वर्गांना हजर राहण्यास याच अटीवर विद्यार्थी राजी झाले होते. यावर्षी मात्र नामदेवराव पोरेड्डीवार महाविद्यालयाचे राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर येथे समायोजन करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. यामुळे गडचिरोली येथे शिकणाºया सर्वच विद्यार्थ्यांना चंद्रपूर येथे राहावे लागणार आहे. चंद्रपूर येथे राहून शिक्षण घेण्याजोगे येथील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे समायोजन रद्द करावे. काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली असून महाविद्यालयालाही शुल्क जमा झाले आहे. या शुल्कातून प्राध्यापकांचे वेतन देणे शक्य आहे. व्यवस्थापन जर महाविद्यालय चालवू शकत नसेल तर विद्यापीठाने महाविद्यालय चालवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. निवेदनावर नितेश राठोड, वैशाली भांडेकर, दामिनी सिंग, दिलीप खोब्रागडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
इंजिनिअरींग कॉलेज सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:19 PM
बोदली येथील नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी हे महाविद्यालय पूर्ववत सुरू करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे याच महाविद्यालयात वर्ग व परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे मागणी : दुसऱ्या महाविद्यालयात समायोजनास विरोध