लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे विधायक कामे व पक्षाची ध्येय-धोरणे प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी तरु ण पिढीने पुढाकार घेऊन नव्या जोमाने कामाला लागावे. हे करताना आपसातील मतभेद आणि हेवेदावे बाजुला सारावे, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे कार्यकर्त्यांना दिल्या.गृहमंत्री म्हणून त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त गडचिरोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. मेळावाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश प्रवक्ते तथा सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, प्रदेश संघटन सचिव युनूस शेख, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, सुरेश सावकार पोरेड्डीवार, बबलू हकीम, रा.काँ.महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष ऋ षिकांत पापडकर, श्रीनिवास गोडशेलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, प्रकाश ताकसांडे, शाहीन हकीम यांनीसुद्धा विचार व्यक्त केले. तत्पूर्वी ना.अनिल देशमुख आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठ्या पुष्पहाराने आणि शाल-श्रीफळ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त सभापती युधिष्ठिर बिश्वास यांचाही सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक रविंद्र वासेकर, संचालन जगन जांभुळकर यांनी तर आभार संजय कोचे यांनी मानले.गडचिरोली जिल्ह्याला झुकते मापदुर्गम समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील रेंगाळत असलेली कामे, नोकरदारांची कमतरता व नव्याने नोकरभरतीची प्रक्रि या राबवून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्नशील राहण्यासोबतच या जिल्ह्याला निधीत झुकते माप देणार असल्याचे यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले.
हेवेदावे बाजूला सारून पक्षाच्या कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 6:00 AM
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे विधायक कामे व पक्षाची ध्येय-धोरणे प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी तरु ण पिढीने पुढाकार घेऊन नव्या जोमाने कामाला लागावे. हे करताना आपसातील मतभेद आणि हेवेदावे बाजुला सारावे, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे कार्यकर्त्यांना दिल्या.
ठळक मुद्देसंडे अँकर । अनिल देशमुख यांच्या कानपिचक्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार