गडचिरोली : लोकमत सखी मंचच्या २०१६ सत्राच्या नोंदणीला १३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. सखी मंच सदस्यता नोंदणी करणाऱ्या सखींना विविध प्रकारची आकर्षक बक्षीसे यासह वैयक्तिक अपघाती विम्याचेही सुरक्षा कवच मिळणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणी करणाऱ्या सदस्यांना ओळखपत्र, युरो कॅसरोल स्टिल सेट, फिटनेस बुक, १ लाखांचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा तसेच विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीसाठी शहर व ग्रामीण भागात जुने व नवीन सदस्यांसाठी वेगवेगळे नोंदणी शुल्क राहणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीसाठी लोकमत जिल्हा कार्यालयात व्यवस्था करण्यात आली असून महिलांनी नोंदणीसाठी जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम (९५९५४३२९८८), सोनिया बैस (९५४५७४६४०७) यांच्याशी संपर्क साधावा. तर देसाईगंज येथे कल्पना कापसे (९४२११०१७०५), कुरखेडा येथे माई मेश्राम (७००७२८६११५), रजनी आरेकर (९४२३६२१४०६), आरमोरी येथे सुनीता तागवान (७७७५९३३४२८), वैरागड येथे ज्योत्सना बोडणे (८३८०९८३८७२), चामोर्शी येथे चैताली चांदेकर (९४०४८२७७१०), आष्टी येथे प्रज्ञा फरकाडे (९४२३५९७४९०), आलापल्ली येथे शिल्पा कोंडावार (८२७५८१३७९१), अहेरी येथे पूर्वा दोंतुलवार (९७६७६२५२७२), मंगला निखाडे (८०५५९५४३०१), सिरोंचा येथे अर्चना चकिनारपुवार (९४०५५२०५४९), माया चव्हाण (९४०४१३१२३६), घोट येथे भारती उपाध्ये (९४२०४१८३६३), आशा पेटकर (८३०८३८८३२९), धानोरा येथे ज्योती उंदीरवाडे (७५८८४९०४०७), रंजना गडपाडे (९४२३७६७८१२), एटापल्ली येथे पूजा पुल्लुरवार (९४०५८४६४१९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
१३ पासून जिल्ह्यात सखी मंच नोंदणीला प्रारंभ
By admin | Published: February 11, 2016 12:07 AM