देसाईगंज तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत पिंपळगाव व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत दोन ठिकाणी खरेदी केंद्र आहेत. परंतु अजूनपर्यंत कोणत्याच खरेदी केंद्राने धान खरेदीची सुरुवात केली नाही. शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात धान विकत आहेत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ संस्थेकडून खरेदी केलेल्या धान्याच्या भरडाईचा तिढा सुटल्याने रब्बीतील धान खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु अजून खरिपातील धरणाची उचलत न झाल्याने व गाेदाम उपलब्ध नसल्याने खरेदी संस्थासुद्धा अडचणीत आल्या आहेत. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, वडसा व पिंपळगाव या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. या आशेने शेतकऱ्यांनी धान सुकवून बारदानात भरून ठेवले आहे. काही दिवसातच पाऊस सुरू होत असल्याने धानाची साठवणूक कुठे करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
देसाईगंज तालुक्यातील उन्हाळी धान खरेदी केंद्र लवकर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:27 AM