आरमोरी येथील स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नवीन ऑनलाईन खाते उघडण्याकरिता खूपच त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना नवीन खाते काढणे आवश्यक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक दररोज स्टेट बँकेत चकरा मारीत असतात. एक नवीन खाते काढण्याकरिता पाच ते सहा दिवस लागत आहेत. रोज फक्त ४ ते ५ बँक खाते उघडले जात आहेत. वेळेवर खाते काढून मिळत नसल्याने अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला विचारले असता कर्मचारी कमी असल्यामुळे आणि त्यात कोणी ना कोणी सुट्टीवर राहतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी हाेते. स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय सुपारे व अन्य नागरिकांनी केली आहे.