बबलू हकीम : आष्टी येथे प्राध्यापकांचा सत्कार व निरोप सोहळा आष्टी : देशाचा व राज्याच्या कारभाराविषयी राज्यशास्त्र या विषयात सविस्तर माहिती असते. राज्यकारभाराच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्त्वाचा असून मानवी जीवनासाठी फार उपयुक्त व मोलाचा आहे, असे प्रतिपादन वनवैभव शिक्षण मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी केले. आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठ राज्यशास्त्र प्राध्यापक मित्र मंडळ चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापकांच्या सत्कार समारंभ व सेवानिवृत्ती सोहळ्यात बबलू हकीम बोलत होते. याप्रसंगी डॉ. पी. एल. ढेंगळे लिखित ‘राज्यशास्त्र सिद्धांत’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. समारंभाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. पद्मा पेंंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. राजेंद्र मुद्दलवार, डॉ. संजय गोरे, डॉ. पी. एल. ढेंगळे, डॉ. जहिर हकीम, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय फुलझेले उपस्थित होते. प्रा. डॉ. पद्मा पेंडे यांनी राज्यशास्त्र विषयाचे सूक्ष्म व सखोल मार्गदर्शन केले. तत्पूर्वी डॉ. पी. एल. ढेंगळे लिखित ‘राज्यशास्त्र सिद्धांत’ पुस्तकाचे प्रकाशन व विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यशास्त्र विषयात आचार्य पदवी मिळालेल्या प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये नवरगाव येथील डॉ. संजय नाकाडे, भामरागड येथील डॉ. संतोष डाखरे, अहेरी येथील डॉ. जहिर हकीम, कोरची येथील डॉ. विनोद चहारे यांचा समावेश आहे तर सेवानिवृत्त झाल्याबद्दल डॉ. पद्मा पेंडे यांचा शाल, श्रीफळ व साडी देऊन सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गणेश खुणे यांनी केले तर आभार डॉ. रवी धारपवार यांनी मानले. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
राज्यशास्त्र मानवी जीवनासाठी उपयुक्त
By admin | Published: December 31, 2016 2:31 AM