गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१६-१७ या वर्षात एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५ हजार २१२ शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आले असून अद्यापही तब्बल २९ हजार ३७ शौचालय अपूर्ण स्थितीत आहेत. ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय बांधकामाची गती मंदावली असल्याचे दिसून येते. भाजपप्रणित केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयांना स्वच्छतेचा नारा देऊन महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाची सुरूवात केली. गावातील रस्ते, परिसर झाडू स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले. याशिवाय गोदरीमुक्त गावे घडविण्यासाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ या चालू वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय मंजूर करण्यात आले. अहेरी तालुक्यात एकूण ४ हजार २९३ शौचालयांपैकी आतापर्यंत २७९ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून ४ हजार १४ शौचालय अपूर्ण स्थितीत आहे. आरमोरी तालुक्यात ३ हजार ५४२ शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी केवळ २३२ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून ३ हजार ३१० शौचालय अपूर्ण स्थितीत आहे. भामरागड तालुक्यात १ हजार १४३ शौचालयापैकी १५२ शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आले असून ९९१ शौचालय अपूर्ण स्थितीत आहेत. चामोर्शी तालुक्यात एकूण ३ हजार २५१ शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी ५१९ शौचालय पूर्ण करण्यात आले असून २ हजार ७३२ शौचालय अपूर्ण स्थितीत आहे. धानोरा तालुक्यात ३ हजार १७ शौचालयापैकी १८९ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून अद्यापही २ हजार ८२८ शौचालय अपूर्ण स्थितीत आहे. एटापल्ली तालुक्यात २ हजार ८३० शौचालयापैकी १३९ शौचालय पूर्ण झाले असून २ हजार ८३० शौचालय अपूर्ण आहेत. गडचिरोली तालुक्यात ४ हजार २५४ शौचालयापैकी ७८६ शौचालय पूर्ण झाले असून ३ हजार ४६८ शौचालय अद्यापही अपूर्ण आहे. कोरची तालुक्यात २ हजार ४९० शौचालयापैकी ५०९ शौचालय पूर्ण झाले असून १ हजार ९८७ शौचालय अपूर्ण आहे. कुरखेडा तालुक्यात ३ हजार ७७ शौचालयापैकी १ हजार ६८ शौचालयाचे काम पूर्ण झाले असून २ हजार ९ शौचालय अपूर्ण आहेत. मुलचेरा तालुक्यात ३ हजार ६७० शौचालयापैकी ६५७ शौचालय पूर्ण झाले असून ३ हजार १३ शौचालय अपूर्ण आहेत तर सिरोंचा तालुक्यात २ हजार ६८२ पैकी ६८२ शौचालय पूर्ण झाले असून २ हजार शौचलय अपूर्ण स्थितीत आहेत. पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यात शौचालय बांधकामाची गती वाढणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)यंदा २१ हजाराने उद्दिष्ट वाढलेस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला गतवर्षी शासनाने एकूण १३ हजार ४६३ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षी ९४ टक्के काम झाल्याचे पाहून शासनाने यंदा सन २०१६-१७ वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट २१ हजार ६१७ ने वाढविले आहे. त्यामुळे यावर्षी २१ हजार ६१७ शौचालय गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माण करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील स्थिती : केवळ ५ हजार २१२ शौचालये पूर्ण
By admin | Published: September 28, 2016 2:17 AM