चामाेर्शी तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काेराेना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ही बाब ओळखून प्रशासनाने मुख्य मार्गालगत असलेल्या दुकानांची सॅनिटायझर वाहनाने फवारणी करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शनिवार व रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे फवारणी करणे सोयीचे होत आहे. त्यानुसार २४ एप्रिल रोजी शहरातील मुख्य मार्गालगत दुकानांच्या परिसरात ट्रॅक्टरद्वारे फवारणी सुरू करण्यात आली. शहरातील ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले, अशा भागात नगरपंचायतचे सफाई कामगार पंपाद्वारे फवारणी करीत आहेत. ट्रॅक्टरद्वारे फवारणीचे काम मुख्य रस्त्याच्या भागानेच केले जात आहे. ज्या भागात ट्रॅक्टर जात नाही असे अंतर्गत रस्ते व गल्ल्यांमध्ये पंपाद्वारे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) शहरातील संपूर्ण वाॅर्डात करण्यात येणार आहे. नगरपंचायतचे अभियंता निखिल करेकर यांच्या देखरेखीखाली हाफिज सय्यद व सफाई कर्मचारी काम करीत आहेत.
बाॅक्स
तुंबलेल्या नाल्या उपसा
चामाेर्शी शहराच्या अनेक वाॅर्डातील नाल्यांमध्ये गाळ भरलेला आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचणी येत आहेत. अनेक वाॅर्डात डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे. शिवाय दीड महिन्यानंतर पावसाळ्याला सुरुवात हाेणार आहे. अशा स्थितीत नाल्यातील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून गाळाचा उपसा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
250421\25gad_4_25042021_30.jpg
===Caption===
चामाेर्शी येथे ट्रॅक्टरद्वारे फवारणी करताना कर्मचारी.