शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

ग्रामसेवकांवर होणाऱ्या कारवाया थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:33 AM

माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करीत तक्रारदार जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव टाकून ग्रामसेवकांवर नाहक कारवाई करवून घेत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन : कामांचे ई-टेंडरिंग करण्याची ग्रामसेवक युनियनची मागणी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करीत तक्रारदार जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव टाकून ग्रामसेवकांवर नाहक कारवाई करवून घेत आहेत. मागील अनेक वषार्चा लेखा परिक्षण अहवाल मागवून त्या आधारे संबंधित ग्रामसेवकावर निलंबन व फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा या कथित समाजसेवकांकडून केला जात आहे. त्यामुळे ग्रामसेवकांवर होणाºया कारवाया त्वरित थांबवाव्या, या मुख्य मागणीला घेऊन ग्रामसेवक युनियनने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.ग्रामपंचायतीच्या लेखा परिक्षण अहवालात आक्षेपीत असलेल्या रकमा या वास्तविक व वस्तुस्थितीशी सुसंगत नसतानाही तक्रारकर्ते खोटा आभास तयार करुन ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी करतात. अनेक प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारीही आकसापोटी अहवाल सादर करीत असतात. न्यायीक दृष्ट्या संबंधित कर्मचाºयाला बाजू मांडण्याची संधी देणे क्रमप्राप्त असतानाही ती पद्धती अवलंबिली जात नाही. परिणामी, ग्रामसेवकाला निलंबन व फौजदारी कारवाईसाठी सामोरे जावे लागत आहे.ई-टेंडरिंगची प्रक्रिया स्विकारल्याशिवाय ग्रामसेवक कोणतेही विकासकामे करणार नाही. शौचालयाचा निधी १५ दिवसाचे आत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करावे. पेसा कायद्यांतर्गत तेंदू व बांबूची लिलाव प्रक्रिया ग्रामसेवक करणार नाही. अन्यायग्रस्त ग्रामसेवकांना पुनर्स्थापित करावे, अशीही मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, कार्याध्यक्ष नवलाजी घुटके, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सरचिटणीस दामोधर पटले, व्यंकटरमन गंजीवार, अर्चना श्रीगिरवार, संतोषी सडमेक, गोपिनाथ बोरकुटे, मंगरू मोगरकर, विजय गडपायले, दिवाकर निंदेकार, वंदना वाढई, रंजित राठोड, संजिव बोरकर, देवानंद फुलझेले, दिलीप मेश्राम आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते. आंदोलनाला खा. अशोक नेते, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश नाकतोडे यांनी भेट दिली.असहकार आंदोलन सुरूग्रामसेवक युनियनने १४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले असले तरी ग्रामपंचायतीची वैधानिक कामे, करवसुली, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, नागरिकांना प्रमाणपत्र, मासिक सभा, ग्रामसभा आदी कामे करणार आहेत. पंचायत समिती व जिल्हास्तरावरील मासिक, प्राक्षिक, विशेष सभांवर बहिष्कार टाकून दौरा दैनंदिनी व जन्म-मृत्यू अहवाल वगळता कोणताही अहवाल सादर न करण्याचा निर्णय घेतला आहे.