गडचिराेली : चटपटीत जेवणाची सवय अनेकांना असते. अधिक तिखट व मसालेदार पदार्थांचा वापर जेवणात करण्याची एक प्रकारची पद्धत रूढ झाली आहे; परंतु ही पद्धत आराेग्याच्या मुळावर उठू शकते. जिभेचे लाड पुरविण्याच्या सवयीमुळे पाेटात अल्सर हाेण्याचा सर्वाधिक धाेका असताे. त्यामुळे संतुलित साधा आहारच आराेग्यासाठी लाभदायक आहे.
अतितिखट, मसालेदार पदार्थांचा जेवणात वापर केल्यास पाेटातील अंतर्गत भागात विविध ठिकाणी फाेड येतात, यालाच अल्सर असे म्हणतात. याचे प्रमाण अधिक वाढल्यास फाेडे फुटून आराेग्याला धाेका हाेण्याची शक्यता असते. अल्सरमुळे रक्ताभिसरण क्रियेवरही परिणाम हाेताे, तसेच शरीरातील पचनसंस्थेला धाेका पाेहाेचताे.
बाॅक्स ...
काय आहेत लक्षणे
n जेवणानंतर काही तासांनी पाेट दुखणे
n उलट्या हाेणे
n भूक मंदावणे
n अपचन हाेणे
n वजनात अचानक घट येणे
n मळमळणे
n अल्सरचे प्रमाण वाढल्यास रक्ताच्या उलट्या
n हगवण
n मूळव्याधीचा त्रास
n कोलोस्टेरॉल वाढणे
n रक्ताभिसरण क्रियेमध्ये अडथळा येणे
बाॅक्स ....
काय काळजी घेणार
अतितिखट व मसालेदार पदार्थांचा समावेश असलेले पदार्थ टाळावे, तेलकट पदार्थ खाऊ नयेत, वेळेवर जेवण घ्यावे. चहा, काॅफी अतिप्रमाणात घेऊ नये, तसेच दारू, तंबाखू तसेच अन्य तंबाखूजन्य व मादक पदार्थ टाळावेत.
खूप उशिरा जेवण केल्याने, तसेच दाेन वेळच्या जेवणातील अंतर जास्त राखल्याने पाेटात दुखण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ही सवय टाळावी. अनेकजण विविध कारणांमुळे चिंता करतात. याचा परिणाम व्यक्तीच्या खानपानावर हाेताे. त्यामुळे अधिक चिंता करू नये.
अल्सरची लक्षणे आढळून येताच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याेग्यवेळी उपचार करावा. तेव्हाच प्राथमिक अवस्थेतच अल्सरसारख्या समस्येवर औषधाेपचाराने मात करता येते.
काेट ..
साधा व संतुलित आहार महत्त्वाचा
तिखट व मसाले कमी प्रमाणात असलेला साधा आहार घ्यावा. जेवणासाठी कधीही उशीर करू नये. पाेटात अल्सरचे प्रमाण वाढल्यास गंभीर समस्या उद्भवून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच औषधाेपचार घ्यावा.
- डाॅ. माधुरी किलनाके.
तिखट व मसाले जास्त प्रमाणात वापरल्यास पाेटातील विविध विकारांना आमंत्रण मिळू शकते. चहा, काॅफी याेग्य प्रमाणात घ्यावे, तसेच हिरव्या पालेभाज्या, दूध आहारात नियमित वापरल्यास आराेग्य उत्तम राहते.
- डाॅ. प्रशांत कारेकर.