प्रशासनाने नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनामे केले. त्यामध्ये कोरची शहरातीलच १२ घरांचे ७० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. बेळगाव येथील ५ घरांचे ११ हजार रुपयांचे, सातपुती येथील ३ घरांचे ३४ हजार ५०० रुपये तर मर्केकसा येथील एका घराचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्व घरांचे मिळून १ लाख १६ हजार रुपयांचे आता नुकसान झाले. तसेच कोरची तहसील कार्यालयाच्या पटांगणात असलेले बीएसएनएल टॉवर कोसळले. तसेच शासकीय आश्रमशाळेतील मुलांच्या वसतिगृहाचे सिमेंटचे पत्रे उडाले व शासकीय गोदामाचे टिनाचे पत्रे उडाले. अनेक विद्युत तारा व खांब तुटल्याने वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले.
मागील वर्षीसुद्धा ३ जूनला वादळाच्या तडाख्याने कोरची तालुक्यातील २५ घरे व ४ गोठ्यांचे एकूण १ लाख ६९ हजार ३१५ रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी व तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्तवासीयांना भेट देऊन त्यांना नुकसानभरपाई मिळवून देणाचे आश्वासन दिले होते, परंतु ते आतापर्यंत मिळाले नाही. यावर्षीही वादळामुळे २१ घरांचे एकूण १ लाख १६ हजार रुपयांचे लोकांचे नुकसान झाले. ते केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.