आर्थिक मदतीची मागणी : अनेक घरांचे छत उडाले; आमदारांनी दिली भेटलोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील श्रीनिवासपूर परिसराला शुक्रवारी वादळाचा तडाखा बसला. यात श्रीनिवासपूर येथील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आ. डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी श्रीनिवासपूरला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. वादळाने घरांना तडाखा बसून श्रीनिवासपूर येथील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये मृणाल हलदर यांचे दीड लाखांचे, रंजन सिकदर यांचे ५० हजारांचे, आदित्य मिर्धा यांचे एक लाखाचे, मनोरंज मिर्धा यांचे दीड लाखांचे, निर्मल गाईन यांचे ७५ हजारांचे, दुलाल मिर्धा यांचे ८५ हजारांचे, अतुल बैरागी यांचे ९५ हजारांचे, माणिक शील यांचे ६० हजारांचे, गौरी हलदार यांचे सव्वा लाखांचे, श्यामपद सरकार यांचे ८० हजारांचे, नरेन सरकार यांचे सव्वा लाखांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जि. प. सदस्य विद्या आभारे यांनी चामोर्शीच्या तहसीलदारांकडे केली आहे. आ. डॉ. देवराव होळी व पदाधिकाऱ्यांनी गावातील नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले व गावातील नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान आ. डॉ. देवराव होळी व जि. प. सदस्य विद्या आभारे यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी केली व ग्रामस्थांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पं. स. सदस्य विष्णू ढाली, सरपंच बाबू रॉय, ग्रा. पं. सदस्य रतन सरकार, मृणाल हलदार, रणजन सिकदर, आदित्य मिर्धा, मनोरंजन मिर्धा, निर्मल गाईन, दुलाल मिर्धा, बैरागी, माणिक शील व गावातील नागरिक उपस्थित होते. तत्काळ नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
श्रीनिवासपूरला वादळाचा तडाखा; घरांचे नुकसान
By admin | Published: June 04, 2017 12:42 AM