अहेरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत ते बाेलत हाेते.
याप्रसंगी खा. अशाेक नेते, आ. डाॅ. रामदास आंबटकर, आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवी ओल्लालवार, गोविंद सारडा, भाजप तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, जिल्हा उपाध्यक्ष विनोद अक्कनपल्लीवार, जिल्हा सचिव संदीप कोरेत, पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, अमोल गुडेल्लीवार, मुकेश नामेवार, पप्पू मद्दीवार, शंकर मगडीवार, श्रीनिवास चटारे, नागेश रेड्डी, नितीन गुंडावार, संजय अलोने, अभिजित शेंडे, नारायण सिडाम, दिलीप पडगेलवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
याप्रसंगी पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यात आली. विजय पुराणिक यांनी पक्ष संघटन कसे वाढवावे, भाजपची विचारधारा घराघरांत कशी पाेहाेचवावी, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.