निवेदनात म्हटले की, परिसरात मुरखळा हे गाव मोठे असून गावात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. थोडा पाऊस किंवा वादळ आला तरी विद्युत पुरवठा खंडित होत असतो तर कधी रात्रभर विद्युत पुरवठा खंडित राहत असतो. त्यामुळे डासांचा सामना करीत रात्र जागावी लागत असते. गावातील नागरिक या समस्येनी ग्रासलेले आहेत. तसेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मोबाईल स्विच ऑफ राहत असतात. त्यामुळे ऑनलाईन कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडितचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसत आहे. गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. निवेदन देतांना मुरलीधर बुरे, किशोर बोधलकर, संजय बुरे, भास्कर बुरे, सुरेश बुरे, लालाजी बुरांडे, अंतराम पवार, श्रीकृष्ण बोबाटे, योगराज बुरे, संदीप गटलेवार, संजय बुरे , सोमनाथ मेश्राम, शंकर सोमनकर, कालिदास नैताम उपस्थित होते.
120921\img-20210912-wa0051.jpg
विज महावितरण अभियंता भेंडाळा यांना निवेदन देतांना मुरखडा येथील नागरिक