वीकेंड लाॅकडाऊनच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती व नगर प्रशासनाची आहे. दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवायची आहेत. मात्र चार वाजल्यानंतरही अनेक प्रतिष्ठाने सर्रास सुरू ठेवण्यात येत आहेत. एकीकडे विनामास्क आढळून आल्यास गोरगरिबांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे; तर दुसरीकडे प्रतिष्ठाने उशिरा सायंकाळपर्यंत नियमांना बगल देऊन गर्दीच्या गराड्यात सुरू आहेत. संबंधित प्रतिष्ठानांवर कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने याबाबत खेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतीलच दुकाने शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत न माेडणारीही दुकाने शनिवारी व रविवारी सुरू हाेती. या दुकानांवर कारवाई करण्याची गरज आहे.
देसाईगंज शहरात वीकेंड लाॅकडाऊनला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:23 AM