लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : येथील नगर पंचायतीत नियमित मुख्याधिकारी नियुक्त करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुरखेडा येथे ३० जानेवारीपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली.कुरखेडा शहरात अनेक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. येथे नियमित मुख्याधिकारी नसल्याने विकास कामात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे येथील नगराध्यक्ष पदही प्रभारीकडे आहे. शहरात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध कराव्या यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी उपोषणाला बुधवारपासून सुरूवात केली.या आहेत प्रमुख मागण्यानगर पंचायत हद्दीत रोजगार हमीची कामे सुरू करावी, शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करावे, सार्वजनिक नळ योजनेची पाईपलाईन त्वरित बदलावी, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मागविलेल्या अर्जांची पात्रता यादी जाहीर करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा, जीर्ण अंगणवाडी इमारतींचे निर्लेखन करून नव्याने बांधकाम करावे आदी प्रमुख मागण्या आहेत.
प्रहारचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:20 AM
येथील नगर पंचायतीत नियमित मुख्याधिकारी नियुक्त करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुरखेडा येथे ३० जानेवारीपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली.
ठळक मुद्देविविध मागण्या : कुरखेडात मूलभूत सोयीसुविधा पुरवा