लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अहेरी, महागाव व आलापल्ली या तीन परिक्षेत्राच्या अंगणवाडी सेविकांचा मेळावा सोमवारी पार पडला. या मेळाव्यात मानधनासाठीचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार करून ५ आॅक्टोबर रोजी जेल भरो आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.या मेळाव्याला ज्योती कोमलवार, जहारा शेख, छाया येमनुरवार, शैला पठाण, रजिया शेख, भाग्यश्री कुत्तरमारे, मैनाबाई राऊत, शमिना शेख, कल्पना श्रीरामवार, रेखा गेडाम, सुधा देशपांडे, लता ओंढरे, आशा दोंतुलवार, कलावती बोगीरकर, सुमन वेडधा, सुगंधा लेनगुरे, साहिब शेख, वैजंती देव, शबाना शेख, पूजा कांबळे, शोभा येलपुलवार, ललीता मडावी, मासूम शेख, सरिता अलोने उपस्थित होत्या. ११ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आपल्याला न्याय मिळेपर्यंत आंदोलन अविरत सुरूच राहील, ५ आॅक्टोबर रोजी गडचिरोली येथे अंगणवाडी कृती समितीतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.
मानधनाचा लढा तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:33 AM
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अहेरी, महागाव व आलापल्ली या तीन परिक्षेत्राच्या अंगणवाडी सेविकांचा मेळावा सोमवारी पार पडला.
ठळक मुद्देअहेरीत मेळावा : अंगणवाडी कर्मचाºयांचा निर्धार