शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

जातीय विषमता मोडून संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 10:39 PM

अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी.

ठळक मुद्देसमाज प्रबोधन कार्यक्रम : गडचिरोली व देसाईगंज येथे अमोल मिटकरी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/ देसाईगंज : अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी. आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करायला तयार राहावे, असे प्रतिपादन ओबीसी बहुजनवादी वक्ते अमोल मिटकरी यांनी केले.गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल व देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. गडचिरोली येथील कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल मिटकरी यांच्यासह मूलनिवासी महिला संघ भंडाराच्या जिल्हाध्यक्ष शरयू डहाट होत्या. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून माळी महिला संघटनेच्या अध्यक्ष सुधा चौधरी, मुख्याधिकारी संजीव ओहोळ होते. गडचिरोली येथील कार्यक्रम राष्टÑीय ओबीसी महासंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, बामसेफ, महिला मैत्री संघ, भारिप बहुजन महासंघ, बीआरएसपी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडिया, बीआरव्हीएम यांच्या वतीने करण्यात आले होते.देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात ओबीसी तालुका संघटनेच्या वतीने आयोजित सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम होते. उद्घाटन मुरलीधर सुंदरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी धनपाल राऊत, सरपंच मारोती बघमारे, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, कमलेश बारस्कर, ममता जांभुळकर उपस्थित होते.पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, रयतेचे राजे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज यांना आपले गुरु मानत होते. स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी जातीयवादाला कदापी थारा दिला नाही. शिक्षणाचे आद्यजनक महात्मा जोतिबा फुले व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सावित्रीबाई फुले यांनी जातीयवादाला थारा न देता शिक्षणामुळेच अज्ञानावर मात करता येणे शक्य असल्याचे ओळखून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिताना ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची भागीदारी, या तत्वावर सर्वांना समता बंधुता व न्याय या सूत्रात बांधून भविष्यातही जातीयवाद उफाळून येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. आपल्या संत महात्म्यांनी आपल्या प्रबोधनातुन जातीयवादावर कट्टर प्रहार करत समाजात फक्त मानवता रुजवण्याचा प्रयत्न केला होता, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला देसाईगंज तालुक्यातील कुणबी, कोहळी, माळी, तेली, नाभिक, सुतार, लोहार, सोनार, परीट, श्रमिक समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. संचालन प्रदीप तुपटे, प्रास्ताविक प्रा. दामोदर शिंगाडे तर आभार दिलीप नाकाडे यांनी मानले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती