लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : १५ जून रोजी झालेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांनी बाह्य मशागत करून धान पऱ्हे टाकले. पण त्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. परिणामी धान पऱ्हे धोक्यात आले आहे. या धान पऱ्ह्याला वाचविण्यासाठी शेतकरी गेल्या चार पाच दिवसांपासून धडपड करीत आहेत.वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकले ते धान पऱ्हे टाकले मात्र पावसाअभावी अशा पऱ्ह्यांची वाढ झाली नाही. आता हे पऱ्हे करपू लागले असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आरमोरी तालुक्याच्या वैरागड, वनखी, वासाळा, चामोर्शी माल या भागात गेल्यात तीन-चार वर्षात अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून शेततळे, सिंचन विहीर, मोटारपंप, बोअर आदी सिंचन सुुविधा केल्या. परिणामी आरमोरी तालुक्यातील २५ एकरपेक्षा अधिक शेतजमीन ओलिताखाली आली. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने शेतीला पाणीपुरवठा करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या पाण्यावर धान पीक रोवणीचे काम हाती घेतले आहे. मिळेल त्या स्त्रोतातून शेतकरी शेतात पाणी पुरवठा करीत आहेत.खरीप हंगामातील पेरणीसाठी बराच वेळ आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी केली आणि आता पावसाअभावी धान पºहे करपले. ज्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे करपले त्यांनी आता पानपऱ्ह्यांची पेरणी करावी.- टी. डी. ढगे, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी.
धान पऱ्हे वाचविण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:00 AM
वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे. पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही.
ठळक मुद्देपावसाने मारली दडी : सिंचन विहीर, शेततळ्यामुळे झाली सिंचन सुविधा