यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचें वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला हाेत हाेते. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याची २३ तारीख ते ३१ तारखेचे उत्पन्न आरक्षित ठेवले जात हाेते. मात्र, काेराेनाच्या काळापासून एसटी अतिशय आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे आजपर्यंत पूर्ण वेतन मिळाले असले, तरी ते वेळेवर कधीच मिळाले नाहीत. ऑगस्ट महिन्यात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हणजेच सणांची रेलचेल राहते. त्यामुळे अतिरिक्त खर्च हाेते. मात्र, याच महिन्यात वेतन झाले नाही. जुलै महिन्याचे वेतन ७ ऑगस्टला हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, ते अजूनही झाले नाहीत. त्यामुळे सणासुदीच्या या काळात खर्च कसा भागवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
उत्पन्न कमी खर्च कायम
गडचिराेली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीनही विभागांमध्ये मानव विकास मिशनच्या बसेस आहेत. या बसेसची संख्या जवळपास निम्मी आहे. शहरातील शाळा बंदच असल्याने या बसेस अजुनही बंदच आहेत, तसेच ग्रामीण भागातूनही प्रवासी मिळणे आता एसटीला कठीण झाले आहे. एकीकडे एसटीचे उत्पन्न कमी झाले असताना खर्च मात्र कायम आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ताेटा वाढतच चालला आहे.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
उसणवारी तरी किती करायची
काेराेना कालावधीपासून वेतन कधीच नियमित मिळत नाही. त्यामुळे उसणवारी करूनच खर्च भागवावा लागत आहे. मात्र, उसणवारी करून आता थकलाे आहाेत. असे वाटते की, एसटीची नाेकरी साेडून आता दुसरी नाेकरी करणे परवडेल. मात्र, दुसऱ्या क्षेत्रातही मंदीच आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही फारसे वेतन मिळणार नाही. काय करावे, असा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
एकूण आगार- ३
एकूण कर्मचारी- १,१००