समस्या सोडवा : गडचिरोलीत आंदोलनगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत लाझेंडा परिसरात असलेल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी बुधवारपासून विविध समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. वसतिगृहाच्या गृहपाल किन्नाके यांना विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी निलंबित करण्यात यावे, प्रलंबित निर्वाहभत्ता तत्काळ अदा करण्यात यावा, दरी, चादर, ब्लँकेट, बेडसीट, गादीचा पुरवठा करण्यात यावा, वसतिगृहात व आवारात विद्युतची व्यवस्था करण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी आदीसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थिनींनी उपोषण सुरू केले आहे. आविसच्या कार्याध्यक्ष रविता नैताम, देवेश्री टोहलीया, पल्लवी फुलसंगे व इतर विद्यार्थिनींनी उपोषण सुरू केले आहे.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी उपोषणावर
By admin | Published: October 29, 2015 2:01 AM