आॅनलाईन लोकमतगडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील कोर्ला या गावापर्यंत दिवाळीनंतर बस सुरू केली जात होती. मात्र या वर्षी दिवाळी संपूनही बस सुरू करण्यात आली नाही. परिणामी नागरिक व विद्यार्थ्यांना बैलबंडीने प्रवास करावा लागत आहे.कोर्ला हे गाव सिरोंचा तालुका स्थळापासून सुमारे ७० किमी अंतरावर आहे. या परिसरात ये-जा करण्यासाठी कोणतेही खासगी प्रवासी वाहन नाही. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट राहत असल्याने पावसाळ्यात बस बंद राहत होती. दिवाळीनंतर मात्र बस सुरू केली जात होती. यावर्षी दिवाळी आटोपूनही बस सुरू करण्यात आली नाही. नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी सिरोंचा येथे जावे लागते. मात्र वाहतुकीची साधन नसल्याने अनेक नागरिकांना बैलबंडीच्या सहाय्याने तालुकास्थळ गाठावे लागत आहे. त्यामुळे बस सुरू करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नारायण तलांडी, चेलमया सडमेक, रामलु तलांडी, प्रकाश आलम बसवय्या दुर्गम यांनी केली आहे.
गडचिरोलीत विद्यार्थ्यांना बसअभावी करावा लागतो बैलगाडीने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:46 AM
सिरोंचा तालुक्यातील कोर्ला या गावापर्यंत दिवाळीनंतर बस सुरू केली जात होती. मात्र या वर्षी दिवाळी संपूनही बस सुरू करण्यात आली नाही. परिणामी नागरिक व विद्यार्थ्यांना बैलबंडीने प्रवास करावा लागत आहे.
ठळक मुद्देपावसाल्यापासून बस बंददिवाळी उलटूनही बसफेरी सुरू नाही