शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन घरच्या डब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:36 AM

केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यातील वास्तव : तांदूळ व कडधान्य पुरवठ्याअभावी योजना ठप्प

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही. परिणामी अहेरी शहरासह अनेक ठिकाणच्या शाळांमधील विद्यार्थी घरून आणलेल्या डब्ब्यावर दुपारचे भोजन आटोपत असल्याचे विदारक वास्तव उजेडात आले आहे. शासनाची ही योजना गेल्या सात-आठ दिवसांपासून तालुक्यात ठप्प आहे.अहेरी पंचायत समितीमधील एकूण २०७ शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १९३ शाळांचा समावेश आहे. उर्वरित शाळा खासगी व्यवस्थापनाच्या आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या टिकावी, गळती थांबावी तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाने शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहेरी तालुक्यातील शाळांना तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरून डब्बा आणून दुपारचे भोजन करावे लागत आहे. अहेरी तालुक्यातील अर्ध्याअधिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना बंद असल्याची माहिती आहे. सदर योजनेअंतर्गत शासनाने सुुरुवातीलाच सर्व शाळांना इंधन व इतर बाबींसाठी खर्च करावा व यापोटी येणारे बिल सादर करावे, असे सांगण्यात आले. शाळांचे मुख्याध्यापक व योजनेच्या प्रमुखांनी काही दिवस स्वत: पुढाकार घेऊन या योजनेसाठी खर्च केला. मात्र शासनाद्वारे पुरविण्यात येणारे तांदूळ पुरवठा करणे बंद झाले. शाळास्तरावर तांदूळ व इतर साहित्याची खरेदी करून त्याचे बिल सादर करावे, अशा शासनाच्या सूचना होत्या. मात्र याबाबीला अनेक शाळांचे मुख्याध्यापक असमर्थता दाखवित असल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावर संक्रात येण्याची शक्यता आहे.शासनाने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रती विद्यार्थी १०० ग्रॅम तांदूळ व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ देण्याचे या योजनेत नमूद केले. सदर योजना लागू असलेल्या अहेरी तालुक्यातील एकूण २०७ शाळांमध्ये ५ हजार ५८ मुले व ४ हजार ७७८ मुली असे एकूण ९ हजार ८३६ विद्यार्थी सदर शालेय पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये ६ हजार ४१४ विद्यार्थी प्राथमिक श्रेणीत येतात.या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्रॅमनुसार ६४१ किलो ग्रॅम तांदूळ व माध्यमिक शाळांमधील ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम प्रमाणे ५१३ किलो ग्रॅम तांदूळ दररोज लागते. एकंदरीत १ हजार १५४ किलो ग्रॅम तांदूळ अहेरी तालुक्यातील या सर्व शाळांना आवश्यक आहे. मात्र पुरवठ्याअभावी आहार बंद आहे.जास्त पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थी वंचितअहेरी तालुक्यातील ज्या लहान शाळांमध्ये १ ते ३० पर्यंत पटसंख्या आहे, अशा शाळांमधील मुख्याध्यापक उधारीवर तांदूळ व कडधान्य खरेदी करून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देत आहेत. मात्र १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना एका दिवशी भरपूर प्रमाणात तांदूळ लागत असल्याने अशा शाळांमधील मुख्याध्यापकांनी साहित्याची जुळवाजुळव करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे तालुक्यातील मोठ्या शाळांमधील विद्यार्थी मध्यान्ह भोजन योजनेपासून वंचित आहेत. परिणामी अनेक शाळांचे विद्यार्थी काही दिवसांपासून घरून भोजनाचे डब्बे नेत आहेत.आम्ही संपूर्ण शाळांसाठी पोषण आहाराकरिता लागणारे तांदूळ व कडधान्याच्या मागणीची यादी जि.प. स्तरावर पाठविली. मात्र तांदूळ पुरवठ्याची कंत्राट प्रक्रिया न झाल्यामुळे तांदूळ व इतर साहित्याचा पुरवठा झालेला नाही. अशा परिस्थितीत तालुक्यातील ही योजना लागू असलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरील या साहित्याची खरेदी करून विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापकांनी बिल सादर करावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.- निर्मला वैद्य, प्रभारी गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, अहेरी