गडचिरोली : गाव, वॉर्ड परिसरात स्वच्छता नांदावी व वातावरण आरोग्यदायी राहावे या उद्देशाने आमगाव, मुरखळा, रामनगरात स्वच्छता उपक्रम विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात आला व संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आले. आमगाव : पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत येणाऱ्या आमगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व लोकसेवा विद्यालयाच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्राम शिक्षण समितीचे सदस्य, ग्रा. प. चे पदाधिकारी, गुरूदेव सेवा मंडळ व स्वामी नरेंद्र महाराज समिती, महामाया बौद्ध समाज समिती, मत्स्यगंधा व्यवसाय सेवा सोसायटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहीमेत ग्रामपंचायत अंगणवाडी, तलाठी कार्यालयाचे कर्मचारी व गावातील नागरिक सहभागी झाले सहभागी झाले होते. स्वछता मोहीमेकरिता पं. स. च्या सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, जि. प. सदस्य जयमाला पेंदाम, विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, सरपंच अरूणा दोनाडकर, उपसरपंच नारायण देशमुख, पी. एल. पेशने, मुख्याध्यापक तितिरमारे, जांभुळकर, लोथे, दुपारे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. रामनगर, गडचिरोली : पोटेगाव फॉरेस्ट कार्यालयालगतच्या परिसरात सर्वाेदय मंडळ, अंधश्रद्धा निमूर्लन समिती, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास आदी संघटनेचे पदाधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी शामकांत मडावी, मुर्लीधर बद्दलवार, विलास निंबोरकर, पी. बी. ठाकरे, देवराव भोगेवार, भाऊराव बोबाटे, आबाजी नरूले, महमद मुस्तफा, अब्दुल शेख, वामन म्हशाखेत्री, सुधीर त्रिनगरीवार, डॉ. वर्धेवार, पुरूषोत्तम सिडाम सहभागी झाले होते. मुरखळा : स्व. सैनूजी पाटील कोवासे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छता मोेहीम राबविण्यात आली. एकता दौड स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने शाळा परिसरात स्वच्छता उपक्रम राबविला. त्याबरोबरच राष्ट्रीय एकतादिनी दौड स्पर्धेतही सहभाग दर्शविला. यावेळी संतोष संगणवार, प्रा. रोषण पाटील, प्रा. मनोहर खंडाते, प्रा. फुलझेले उपस्थित होते. गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली : येथील वर्ग ११ वीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने हनुमान देवस्थान परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्राचार्य संजय भांडारकर, काशिनाथ भोंगाडे, प्रशिक्षक हुलके, चालक संदीप चांदेकर उपस्थित होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, खर्रापन्या, खाद्यपदार्थांचे पॉकीट आदी टाकाऊ पदार्थ उचलून स्वच्छता मोहीम राबविली. प्लास्टिकचे प्रदुषण रोखण्यासाठी कापडी व कागदी पिशव्याचां वापर करा असा संदेश विद्यार्थ्यांनी स्वच्छतेतून दिला. रविवारला सकाळी ८ ते १० या वेळेत सेमाना देवस्थान परिसरात विद्यालयातील इतर वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मोहीम राबविली.
विद्यार्थ्यांनी उचलला परिसर स्वच्छतेचा विडा
By admin | Published: November 09, 2014 11:21 PM