आष्टी : येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आष्टी - मार्कंडा मार्गावर पशु-पक्ष्यांकरिता पाणपाेई लावून पिण्याच्या पाण्याची साेय केली. आष्टी-मार्कंडा कंसाेबा जंगलाच्या मार्गावर कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नाही, हे लक्षात येताच महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग, ओम विकास बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही पाणपाेई लावण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन प्राचार्य मनाेरंजन मंडल, प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, प्रा. बी. के. राठोड, प्रा. वासुदेव हिरादेवे, प्रा. डॉ. राज मुसने, प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा. श्याम कोरडे, प्रा. रवी गजभिये, राज लखमापुरे, नीलेश नाकाडे, लक्ष्मण दूरशेट्टी, नारायण दडजाम, विनोद तोरे, दिलीप मडावी, मोहम्मद मुस्ताक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भारत पांडे यांनी पशु-पक्षी पाणपोईच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली.
पशु-पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी लावली पाणपाेई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:36 AM