शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उपविभागीय व तहसील कार्यालय पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 5:00 AM

एसडीओ कार्यालय व तहसील कार्यालय ओस पडले आहेत. गडचिराेली व एटापल्ली येथे तिसऱ्याही दिवशी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच हाेता.  महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथे कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. नायब तहसीलदार व वर्ग-३ चे कर्मचारी यामुळे त्रस्त आहेत. नायब तहसीलदार हे पद राज्यस्तरावरून भरण्याबाबतचा निर्णय रद्द करावा तसेच प्रलंबित समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली/एटापल्ली : मागील दाेन वर्षांपासून मंडळ अधिकारी व अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे. तसेच महसूल सहायकांची अनेक पदे रिक्त आहेत. पदाेन्नतीसह रिक्त पदे लवकर भरावी, या मागणीसाठी उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसडीओ कार्यालय व तहसील कार्यालय ओस पडले आहेत. गडचिराेली व एटापल्ली येथे तिसऱ्याही दिवशी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच हाेता. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथे कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. नायब तहसीलदार व वर्ग-३ चे कर्मचारी यामुळे त्रस्त आहेत. नायब तहसीलदार हे पद राज्यस्तरावरून भरण्याबाबतचा निर्णय रद्द करावा तसेच प्रलंबित समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांना  नायब तहसीलदारपदी नियुक्ती द्यावी, तसेच महसूल सहायकांची रिक्त पदे भरावी, या मागणीसाठी गडचिराेली येथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ४ एप्रिल राेजी आंदाेलनाच्या चाैथा टप्प्यानुसार निदर्शने करण्यात आली. या संपाला जिल्हा परिषद महासंघाने पाठिंबा दिला. दरम्यान मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, सत्यनारायण अनमदवार, देवेंद्र दहीकर, लतीफ पठाण, गजानन भांडारकर, धीरज जुमनाके, ज्ञानेश्वर ठाकरे, सुनील दिवसे, पांडुरंग राऊत, पीयूष आखाडे, वासुदेव मडावी, रंजना कुशुमवार, सोनाली कंकलवार, अर्चना  दुधबावरे, सुनीता शिवनकर यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेती सदस्य  उपस्थित होते.

एटापल्लीत पाळला संप-    एटापल्ली येथील बेमुदत आंदोलनात पुनेश पोटावी, जे.जी. काडवाजीवार, विलास तुपट, जगदीश राठोड, संतोष करपे, रवी येरमे, दुष्यंत कोवे, जयदेव नारदेलवार, एस.डी. रेवेली, एम.एल. बंदुकवार, यशवंत दुर्गे, दीपक घागरगुंडे, संतोष माने, अनिल राठोड, आनंद वनकर, सुनील वेस्कडे, शारदा घुमडवार,मुन्ना खोब्रागडे, पुसू पुंगाटी आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

चामाेर्शीतील महसूल कर्मचारी संपावर

अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तसहीलदारपदी मागील दाेन वर्षांपासून पदाेन्नती हाेत नसल्याने तसेच महसूल सहायकांची पदे भरली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये राेष आहे. शासनाने मागण्या मान्य कराव्या, यासाठी चार टप्प्यांत आंदाेलन सुरू आहे. यादृष्टीने ४ एप्रिलपासून बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली. चामाेर्शी येथील तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये अव्वल कारकून एस. पी. शेख, किशाेर येरगुडे, आर. डी. भादेकर, शिपाई यमुना मंडरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चारही टप्प्यात चामाेर्शीत आंदाेलन करण्यात आले. 

 

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप