शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात गडचिरोलीत उपनिरीक्षक व जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 6:26 PM

पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्र परिसरातील पोयरकोटी-कोपर्शी जंगल परिसरात घडली.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच जाहीर झाले होते महासंचालकांचे सन्मानचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्र परिसरातील पोयरकोटी-कोपर्शी जंगल परिसरात घडली.शिघ्र कृती पथक (क्युआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजतापासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवित होते. ६.३० वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या गोळीने क्युआरटी पथकाचे उपनिरीक्षक होनमाने आणि जवान आत्राम यांचा वेध घेतला. तसेच दसरू कुरचामी हा जवान जखमी झाला. या चकमकीत ४ ते ५ नक्षलवादीही ठार झाले असण्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. या घटनेनंतर अतिरिक्त कुमक पाठवून त्या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले. दुपारी जखमी जवानासह दोन्ही मृतदेह पोलीस दलाकडील हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. सायंकाळी पोलीस दलातर्फे दोन्ही शहीदांना मानवंदना देण्यात आली.

सन्मान स्वीकारण्याआधीच संपले जीवनपोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे सोलापूर जिल्ह्याचे सूपुत्र आहेत. पंढरपूर तालुक्यातील पुळूज हे त्यांचे मूळ गाव असून ते आॅगस्ट २०१७ पासून गडचिरोली येथे कार्यरत होते. उपनिरीक्षक म्हणून त्यांची येथील पहिलीच नियुक्ती होती. या अल्पशा कालावधीत त्यांनी नक्षलविरोधी अभियानात चांगली कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. पण तो सन्मान स्वीकारण्याआधीच त्यांना शहीद व्हावे लागले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी