शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नक्षलविरोधी अभियानातील यशाने पोलिसांचे मनोधैर्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 11:21 PM

गेल्या १५ दिवसात नक्षल्यांनी हिंसक घटना करीत चार नागरिक आणि दोन पोलीस दलातील जवानांची हत्या केल्यानंतर हादरून गेलेल्या पोलीस यंत्रणेचे मनोधैर्य आता पुन्हा वाढले आहे.

ठळक मुद्देनक्षल्यांचे मनसुबे उधळले : पीएलजीए सप्ताहाचा आज शेवटचा दिवस

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गेल्या १५ दिवसात नक्षल्यांनी हिंसक घटना करीत चार नागरिक आणि दोन पोलीस दलातील जवानांची हत्या केल्यानंतर हादरून गेलेल्या पोलीस यंत्रणेचे मनोधैर्य आता पुन्हा वाढले आहे. दुसरीकडे नक्षलवाद्यांना चांगलाच हादरा बसला आहे.बुधवारी ७ नक्षलवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आल्यानंतर गुरूवारी दोन दलम सदस्य असलेल्या युवा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. गेल्या २ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांचा पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाचा समारोप शुक्रवार दि.८ ला होणार आहे. सप्ताहाच्या आधीच नक्षलवाद्यांनी सतत हिंसक घटना घडविल्याने पीएलजीए सप्ताहात काय होणार याबाबत नागरिकांमध्ये दहशत होती. एवढेच नाही तर पोलिसांनीही नक्षल्यांच्या हत्यासत्राचा धसका घेतला होता. त्यामुळे अपर पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम, पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे हे गडचिरोलीत तळ ठोकून होते. येथूनच त्यांनी नक्षल्यांविरूद्ध कशी आणि कुठे मोहीम राबवायची याची रणनिती आखली. त्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचीही मदत घेतली. नक्षल्यांशी लढण्याचा अनुभव असणाऱ्या छत्तीसगडमधील कोब्रा बटालियनला आधीच गडचिरोलीत पाचारण करण्यात आले होते.या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण नक्षल्यांना संपूर्ण सप्ताहभर कोणत्याही हिंसक कारवाया यशस्वी करता आल्या नाहीत.