कान्होली गावातील महिलांनी कुणाचे मार्गदर्शन न घेता स्वतःच्या कल्पकतेतून सुरुवातीला दरमहा ३० रुपये बचत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हळूहळू या महिलांना बचतीची सवय लागली. काही वर्षांनंतर ५० रुपये प्रति महिना बचत करण्याचे ठरविले. त्यानंतर आता त्या महिला १०० रुपये प्रति महिना बचत करून आतापर्यंत ५० हजार रुपये जमा केले आहेत. बचत झालेल्या रकमेतून बचत गटातील महिलांना आर्थिक हातभार लाभत आहे. महिला दरवर्षी बँकेकडून १ लाख रुपये कर्ज घेत असतात व कर्जाची परतफेड ठरलेल्या कालावधीत करतात.
बचत गटातील कारभार एखाद्या कार्यालयासारखा सुरू आहे. बचत गटाकडे धनादेश बुक, ठराव बुक, कॅश बुक, सभासद पावती बुक यासह इतर दस्तावेज सुरळीतपणे हाताळत असतात. महिला कुठल्याही मार्गदर्शनाविना बचत गट यशस्वीपणे चालवीत आहेत. एवढेच नव्हे तर या बचत गटातील महिला सार्वजनिक उपक्रमात हिरीरीने भाग घेतात, असे बचत गटाच्या अध्यक्ष मालता झरकर यांनी सांगितले. बचत गटात उपाध्यक्ष वनिता कुसराम, सचिव नीता चुनारकर, सदस्य गया चुनारकर, लक्ष्मी चुनारकर, श्यामला चुनारकर, वच्छला चुनारकर, उषा झाडे, तारा सोनटक्के, प्रेमिला गोहणे, वंदना चुनारकर, प्रतिमा कुसराम आदी महिलांचा समावेश आहे.
040721\img-20210704-wa0094.jpg
कान्होलीतील बचत गटाची यशस्वी वाटचाल