लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची पीक घेतले जाते. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धान कापणी व बांधणीच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र या कामासाठी गुत्ता (ठेका) पद्धतीला प्राधान्य दिले जात आहे. या माध्यमातून धान कापणी व बांधणीसाठी शेतमालकांना प्रति एकरी तीन हजार रूपयांचा खर्च येत आहे.आरमोरी, देसाईगंज, कोरची, गडचिरोली, धानोरा तालुक्यात धानाचे क्षेत्र बऱ्यापैैकी आहे. मात्र यापेक्षा सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. सध्या चामोर्शी तालुक्यातही धान कापणी व बांधणीच लगबग सुरू आहे. गुत्ता पद्धतीच्या माध्यमातून धान कापणी व बांधणीच्या कामाद्वारे मजुरांना मजुरी बºयापैैकी पडत आहे. त्यामुळे मजुरांनाही या हंगामाच्या निमित्ताने सुगीचे दिवस आले आहेत.यावर्षी बहुतांश भागातील धान पीक पाण्याअभावी तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे तणशीत रूपांतरित झाले आहेत. परिणामी धानाच्या उत्पादनात घट होणार आहे. अशाही परिस्थितीत शेत मालकांना धान कापणी व बांधणीच्या कामासाठी नगदी रोखरक्कम मोजावी लागत आहे. धान कापणीच्या कामासाठी महिला मजुरांना प्रति एकर दीड हजार व बांधणीच्या कामासाठी दीड हजार रूपये असे एकूण तीन हजार रूपये कापणी व बांधणीसाठी मोजावे लागत आहेत.ठेका पद्धतीमुळे कामाचा वेग वाढलागुत्ता पद्धतीच्या माध्यमातून धान कापणी व बांधणीचे काम ग्रामीण भागात युद्ध पातळीवर केले जात आहे. गुत्ता पद्धतीमध्ये कमी दिवसांत अधिक काम होत असल्याने शेतमालकांचाही कल गुत्ता पद्धतीकडे वाढला आहे. दैैनंदिन रोजीने मजूर लावल्यास काम अधिक दिवस लांबते. काम झटपट व्हावे, यासाठी अनेक शेतमालक धान कापणी व बांधणीच्या कामाचा गुत्ता देत आहेत. गुत्यामध्ये समाविष्ट असलेले महिला व पुरूष मजूर सकाळी ६ ते ७ वाजतापासून शेतशिवारात जाऊन काम हाती घेत आहेत. त्यामुळे चार दिवसांचे काम गुत्त्याच्या माध्यमातून दोन दिवसांत पूर्ण केले जात आहे. यंत्राच्या सहाय्याने धान मळणी केली जात असून सध्यास्थितीत प्रति पोता ७० ते ८० रूपये असा दर घेतला जात आहे. मळणीचे काम गतीने आटोपले जात आहे.
धान कापणी व बांधणीमुळे मजुरांना सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:52 AM
आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची पीक घेतले जाते. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धान कापणी व बांधणीच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र या कामासाठी गुत्ता (ठेका) पद्धतीला प्राधान्य दिले जात आहे.
ठळक मुद्देशेतमालकांना प्रति एकरी तीन हजारांचा खर्च : ग्रामीण भागात हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला